ETV Bharat / bharat

BS Yediyurappa's granddaughter Suicide : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीची गळफास घेत आत्महत्या - बी. एस. येडियुरप्पा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

BS Yediyurappa's granddaughter
बी. एस. येडियुरप्पा
author img

By

Published : Jan 28, 2022, 2:27 PM IST

Updated : Jan 28, 2022, 2:37 PM IST

बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या ( BS Yediyurappa's granddaughter Suicide ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौंदर्या असे तीचे नाव असून ती बी. एस. येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची कन्या होती. तिच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

BS Yediyurappa's 30-year-old granddaughter hangs self
सौंदर्या डॉक्टर म्हणून कार्यरत होती

बेंगळुरूच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये सौंदर्या डॉक्टर म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती आपल्या पती आणि सहा महिन्यांच्या मुलासोबत माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहत होती.

दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्न...

दोन वर्षांपूर्वी सौंदर्याचे लग्न झाले होते. शुक्रवारी सकाळी सौंदर्याचा देह मृत अवस्थेत आढळून आला. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह आता शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेले नाही.

या बातमीने येडियुरप्पा यांचे कुटुंबीय आणि राज्य भाजपाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येडियुरप्पांचे सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतल्याची माहिती आहे.

Last Updated : Jan 28, 2022, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.