दिल्ली : उत्तर पश्चिम दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात रविवारी रात्री एका अल्पवयीन मुलीची चाकूने 21 वार करून हत्या करण्यात आली. साक्षी असे या तरुणीचे नाव आहे. ती शाहबाद डेअरीच्या ई ब्लॉकमध्ये राहत होती. ती तिची मैत्रिण भावनासोबत बर्थडे पार्टीला जाणार होती. भावनाला बोलवायला ती त्याच्या घरी आली होती. भावना घरातून बाहेर पडेपर्यंत साक्षी भावनाच्या घराबाहेर उभी होती.
-
#WATCH | The accused Sahil has been nabbed from Bulandshahr, Uttar Pradesh. He is being brought here. We will collect all the best possible evidence to ensure the accused gets the strictest punishment: Delhi Police Special CP Dependra Pathak pic.twitter.com/plH7mfsQga
— ANI (@ANI) May 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | The accused Sahil has been nabbed from Bulandshahr, Uttar Pradesh. He is being brought here. We will collect all the best possible evidence to ensure the accused gets the strictest punishment: Delhi Police Special CP Dependra Pathak pic.twitter.com/plH7mfsQga
— ANI (@ANI) May 29, 2023#WATCH | The accused Sahil has been nabbed from Bulandshahr, Uttar Pradesh. He is being brought here. We will collect all the best possible evidence to ensure the accused gets the strictest punishment: Delhi Police Special CP Dependra Pathak pic.twitter.com/plH7mfsQga
— ANI (@ANI) May 29, 2023
तरुणाने केले 21 चाकूचे वार : घराबाहेर उभी असताना तेवढ्यात एक तरुण आला आणि साक्षीशी बोलू लागला. कशाचा तरी राग आल्याने त्याने साक्षीवर चाकूने हल्ला केला. यानंतर त्याने दगडाने वार केले. अनेक वार झाल्याने साक्षी रस्त्यावर पडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून साक्षीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी साक्षी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून केल्याचा संशय : दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात तरुणीवर तब्बल 21 वेळा चाकूने वार करुन खून केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या माथेफिरुने चाकुने वार केल्यानंतर साक्षीवर दगडानेही हल्ला केला. त्यामुळे साक्षी या तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्षीला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दिल्लीत तरुणीवर इतक्या निर्घृणपणे चाकुने वार करुन संपवल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.
तरुणीच्या खुनामुळे हादरली दिल्ली : दिल्लीत श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात अत्यंत ठंड डोक्याने खून झाल्याचे उघड झाले होते. मात्र आज नराधमाने साक्षी या तरुणीवर अत्यंत निर्घृणपणे हल्ला केला आहे. या हल्ल्यात माथेफिरू नराधमाने तब्बल 21 वेळा तरुणीवर वार केले आहेत. त्यानंतर या नराधमाने साक्षीवर दगडानेही हल्ला केला आहे. तरुणीचा भरदिवसा खून झाल्याने दिल्लीकर नागरिक हादरले.
हेही वाचा -