ETV Bharat / bharat

सीए अंतिम परीक्षेत बहिण-भावाचा डंका : बहिण नंदिनी देशातून पहिली तर सचिनला मिळाली 18 वी रँक - मुरैना के भाई बहन ने सीए की एग्जाम में किया टॉप

बहिण नंदिनी अग्रवाल हिने चार्टर्ड अकाऊंटेड (सीए) परीक्षेत भारतातून पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे 19 वर्षीय नंदिनीने पहिल्याच प्रयत्नात हे उत्तुंग यश संपादन केले आहे. तर भाऊ सचिन अग्रवालला 18 वी रँक प्राप्त झाली आहे. या दोघांच्याही यशाचं कौतूक करत 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्याशी संवाद साधला आहे.

सीए अंतिम परीक्षेत बहिण-भावाचा डंका
सीए अंतिम परीक्षेत बहिण-भावाचा डंका
author img

By

Published : Sep 14, 2021, 11:18 AM IST

Updated : Sep 14, 2021, 2:48 PM IST

मध्यप्रदेश (मुरैना) - जिल्ह्यातील चंबल अंचल येथील बहिण-भावाच्या जोडीमुळे चंबल अंचलचे नाव उंचावले आहे. बहिण नंदिनी अग्रवाल हिने चार्टर्ड अकाऊंटेड (सीए) परीक्षेत भारतातून पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे 19 वर्षीय नंदिनीने पहिल्याच प्रयत्नात हे उत्तुंग यश संपादन केले आहे. तर भाऊ सचिन अग्रवालला 18 वी रँक प्राप्त झाली आहे. या दोघांच्याही यशाचं कौतूक करत 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्याशी संवाद साधला आहे.

बहिण नंदिनी देशातून पहिली तर सचिनला मिळाली 18 वी रँक

नंदिनी म्हणाली, जोपर्यंत मी माझं पूर्ण काम करत नाही तोपर्यंत झोपत नाही. प्रत्येक दिवशी अभ्यासाच लक्ष्य असायचं आणि याचं जिद्दीमुळे आज भारतातून पहिली आली आहे. नंदिनी सोशल मिडियापासून लांबच आहे.

अभ्यासात नेहमीच अव्वल -

नंदिनी अभ्यासात नेहमीच अव्वल होती. अनेक परीक्षेत तिला पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. अभ्यासाशिवाय कोणत्याच क्षेत्रात मन भटकू न देणे हा तिचा मूलमंत्र आहे. तसेच परिवाराचेही यासाठी मोठे योगदान तिला लाभले.

सोशल मिडियापासून लांबच -

सचिन आणि नंदिनीने सीए उत्तीर्ण होण्याचं लक्ष्य निर्माण केलं होतं. त्यासाठी विशेष करून सोशल मिडियापासून ते दूर होते. त्यांनी आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपवरील सर्व सोशल मिडियाचे अॅप डिलीट केले होते.

आयआयएम पुढील लक्ष्य -

सीए परीक्षेत यश मिळवल्यानंतर नंदिनीने आयआयएम उत्तीर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सीए परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करण्याचे उद्दिष्ठ तिने ठेवले होते. ते आता पूर्ण झाले आहे.

Last Updated : Sep 14, 2021, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.