नवी दिल्ली : शहराच्या जंतर मंतर मैदानावर आज (शुक्रवारी) काही जणांनी आंदोलन केले. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणून फासावर लटकवण्यात यावे अशा मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत होते. आपण हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचे या आंदोलकांनी सांगितले.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटांमधील बळींना न्याय नाही..
दुपारी सुमारे साडेबाराच्या सुमारास सुमारे १०-१५ कार्यकर्त्यांनी या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी दाऊद इब्राहिमविरोधात घोषणाबाजी केली. तसेच, त्याचे पोस्टरही जाळण्यात आले. हिंदूसेना प्रमुख विष्णू गुप्ता म्हणाले, की १९९३च्या स्फोटामधील बळींना २८ वर्षांनंतरही अद्याप न्याय मिळाला नाही. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दाऊदला भारतात आणून फासावर लटकवण्याची मागणी आम्ही करत आहोत.
९३ साली झाले होते साखळी बॉम्बस्फोट..
१२ मार्च १९९३ला मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५०हून अधिक लोकांचा बळी गेला होता. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये एकापाठोपाठ एक १२ ठिकाणी भीषण स्फोट झाले होते. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम होता.
हेही वाचा : ममतांवरील हल्ला प्रकरणी त्वरीत कारवाई करा; एच.डी. देवैगौडा यांची मागणी