ETV Bharat / bharat

Big Breaking : परदेशातून मुंबईत आलेल्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन, दर 48 तासांनी होणार कोरोना टेस्ट - Breaking Updates live news

Big Breaking
Big Breaking
author img

By

Published : Nov 27, 2021, 7:32 AM IST

Updated : Nov 27, 2021, 9:01 PM IST

20:59 November 27

परदेशातून मुंबईत आलेल्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन, दर 48 तासांनी होणार कोरोना टेस्ट

मुंबई - आता कुठे राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसत असताना ओमिक्रॉन (Omicron Variant) या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. या नव्या व्हेरियंटसोबत लढण्यासाठी आता मुंबई महापालिका सरसावली असून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या आज झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

20:58 November 27

राज्य सरकार पाडण्याची आमची इच्छा नाही - गिरीश महाजन

औरंगाबाद - नारायण राणे यांनी मार्चमध्ये राज्यात भाजप सरकार स्थापन होईल असं वक्तव्य केलं, मात्र यावर राज्यातील नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. सरकार यायचं तेव्हा येईल, आम्हाला सरकार पाडण्याची इच्छा नाही, आम्ही विरोधी पक्षात बसू, त्यांच्या पापाचा गडा भरणार आहे, त्यामुळे त्यांचे ते जातील अस वक्तव्य माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं.

20:56 November 27

१८ हजार एसटी कर्मचारी कामावर

मुंबई - कामावर रुजू न होणा-या कर्मचा-यांवर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्यानंतर शनिवारी १८ हजार कर्मचा-यांहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर आजपर्यंत ६२७७ कायम कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि १४९६ रोजंदारी कामगारांच्या सेवा समाप्त केल्याची माहिती एसटी महामंडळ परिवहन विभागाने दिली.

17:13 November 27

लसीकरण करण्यासाठी गेलेल्या नर्स कर्मचारी महिलेचा मृत्यू

लसीकरण करण्यासाठी गेलेल्या नर्स कर्मचारी महिलेचा मृत्यू. लांडगाव वरून विरगाव येथे जात होती महिला कर्मचारी

15:09 November 27

दक्षिण आफ्रिकेतून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मुंबईत आल्यावर क्वारंटाईन करणार

दक्षिण आफ्रिकेतून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मुंबईत आल्यावर क्वारंटाईन केले जाईल आणि त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

09:50 November 27

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा चिपळूण येथील कुंभार्ली घाट ठप्प

जवळपास 6 तास घाट ठप्प
कुंभार्ली घाटातील एका वळणावर ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा
रस्त्याला पडलेला खड्ड्यांमुळे एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने वाहतूक ठप्प
वाहन चालक यांमधून नाराजीने संताप तर दुधाच्या गाड्या अद्याप न आल्याने नागरिकांची गैरसोय

09:42 November 27

नवाब मलिक यांचा ट्विटवरून भाजपवर निशाणा

नवाब मलिक यांचा ट्विटवरून भाजपवर निशाणा

अमित शाह यांच्यासोबत शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्याचा दावा काढला खोडून

फोटो मॉर्फ करून मार्चमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केल्याचे मलिक यांचे ट्विट

07:49 November 27

राजद प्रमुख लालू प्रसाद यादव रुग्णालयात दाखल

राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप आल्यानंतर त्यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे.

07:49 November 27

नियमांचे पालन न केल्याने एसबीआयला एक कोटींचा दंड

रिझर्व्ह बँकेने एसबीआयला एक कोटींचा दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने एसबीआयला दंड ठोठावला आहे.

07:27 November 27

Big Breaking : नागपुरात हवाला व्यावसायिकांवर कारवाई; 84 लाख जप्त

- नागपूर शहरात अवैधपणे सुरू असलेल्या हवाला व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

- पोलिसांनी एकाच वेळी नऊ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यामध्ये ८४ लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

- पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईत एकाच वेळी नऊ हवाला व्यावसायिकांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली आहे.

- लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश चेंबरसह अन्य ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे हवाला व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

Last Updated : Nov 27, 2021, 9:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.