ETV Bharat / bharat

Breaking news ठाण्यात उंबरखांडमध्ये बिबट्याला घरात कोंडले

Breaking news live page
Breaking news live page
author img

By

Published : Aug 23, 2022, 6:50 AM IST

Updated : Aug 23, 2022, 11:58 AM IST

11:54 August 23

ठाण्यात उंबरखांडमध्ये बिबट्याला घरात कोंडले

ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील उंबरखांड येथे पहाटे दोन वाजता एका घरात बिबट्या शिरला. त्याला घरातील एका व्यक्तीने शिताफिने त्याच घरात कोंडुन ठेवले आहे. घटनास्थळी रेस्क्यु टीम दाखल झाली आहे.

11:46 August 23

भंडारा जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटी

भंडारा जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. मुख्य आरोपिंचा शोध सुरू आहे. त्यांचे स्केच तयार केले आहे. तसेच दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

11:37 August 23

5 डेव्हलपर्स विरोधात एफआयआर, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई पोलिसांनी 5 डेव्हलपर्स विरोधात एफआयआर नोंदवला आहे. नो बांधकाम काम आणि सायलेन्स झोन रात्री 10 ते सकाळी 6 या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधान परिषदेला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

09:49 August 23

पुण्यातील नऱ्हे येथील पेट्रोल पंपावर दरोडा

पुण्यातील नऱ्हे येथील पेट्रोल पंपावर दरोडा. कुऱ्हाडीने वार करून रोकड लुटली

09:24 August 23

सापांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक

ठाणे बोआ जातीच्या सापांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कल्याण शहरात 70 लाखांचे साप जप्त केले. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू असल्याचे एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले.

08:10 August 23

एसपी कॉलेज परिसरात माळीकाम करणाऱ्या एकाचा झाड पडून मृत्यू

पुणे एसपी कॉलेज परिसरात माळीकाम करणाऱ्या एकाचा झाड पडून मृत्यू. मालसिंग पवार हे गवत कापत असताना ही घटना घडली. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

08:06 August 23

पत्नीला रेल्वेखाली ढकलून ठार मारणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

वसई रेल्वे पोलिसांनी वसई स्थानकावर पत्नीला रेल्वेखाली ढकलून ठार मारणाऱ्या आणि त्याच्या 2 मुलांसह फरार झालेल्या व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या 302 अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी पतीचा शोध सुरू. रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली.

06:44 August 23

Breaking news बामनवाड्यातील दहीहंडीत जखमी संदेश दळवीचा मृत्यू

दहीहंडीत जखमी संदेश दळवीचा मृत्यू
दहीहंडीत जखमी संदेश दळवीचा मृत्यू

मुंबई बामनवाड्यात दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या संदेश दळवी नावाच्या २४ वर्षीय गोविंदाला १९ ऑगस्ट रोजी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. नंतर नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा काल रात्री ९ वाजता मृत घोषित करण्यात आले आहे. BMC ने ही माहिती दिली.

Last Updated : Aug 23, 2022, 11:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.