ब्राझील : ( Brazilian Football Star Pele ) पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो (Kely Nascimento) हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, ( Rest in Peice ) असे कॅप्शन लिहित केलीने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर जगभरातील फुटबॉलप्रेमी कमेंट करत असून सर्व स्तरातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ( Brazilian Football Star Passed Away )
भावनिक फोटो शेअर : काही दिवसांपासून पेले ( Brazilian Football Star Pele ) यांचे कुटुंबिय साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात जमा झाले होते. या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने पेले यांचा हात धरलेला एक भावनिक फोटो शेअर करत 'बाबा.... माझी ताकद तुमची आहे' असं कॅप्शन दिले होते. तेव्हाच त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समोर आले होते. ज्यानंतर आता अखेर त्यांचं निधन झाले आहे.( Brazilian Football Star Passed Away )
तीन वेळा विश्वचषक विजेतेपद : फुटबॉल जगात अनेक फुटबॉलर्सचे विश्वचषक जिंकणे स्वप्न असते, अशामध्ये तब्बल तीन वेळा विश्वचषक विजेतेपद पटकावणारा एकमेव खेळाडू असलेले पेले ( Pele is the only player to win the World Cup ) अखेर हे जग सोडून निघून गेले. त्यांची कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. याआधी म्हणजे मागील वर्षी पेले यांचा कोलन ट्यूमर काढण्यात आला होता. ज्यानंतर आता कॅन्सर उपचारासाठी पेले रुग्णालयात होते. पण मागील काही दिवसांपासून पेले केमोथेरपीला प्रतिसाद देत नव्हते. ज्यानंतर अखेर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.
पेले फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट मानले जात होते. त्यांना अगदी फुटबॉलचा देवही म्हटले जायचे. ते फुटबॉल कारकिर्दीत फॉरवर्ड म्हणून खेळत होते, त्यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू असेही म्हटले जात होते. फिफानेही पेले यांना महान खेळाडूचे लेबल दिले होते. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते. कारण त्यांनी एक-दोन नाही तर तीन वेळा विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यांच्यामुळेच ब्राझील हा सर्वात यशस्वी फुटबॉल संघ ( Brazil is the most successful football team ) म्हणून जगासमोर आला. आपल्या कारकिर्दीत क्लब, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अशा सर्वात मिळून पेले यांनी जवळपास 1282 गोल मारले होते.
2021 पासून पेलेंची प्रकृती ढासळली होती : पेले यांना 30 नोव्हेंबर रोजी अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात ( Albert Einstein Hospital ) दाखल करण्यात आले होते. त्याआधी सप्टेंबर 2021 मध्ये त्यांना ट्यूमर असल्याचे समोर आले होते. पेले यांच्या कोलनमध्ये ट्यूमर होता.