ETV Bharat / bharat

VIDEO : डॉक्टर करत होते ब्रेन ट्युमरची सर्जरी अन् रुग्ण महिला म्हणत होती हनुमान चालीसा..! - हिंदी न्यूज़

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या ऑपरेटिंग रूममध्ये ऑपरेशन दरम्यान हनुमान चालीसाचे भक्ती श्लोक कानावर पडले. एका २४ वर्षीय युवतीची एम्समध्ये ब्रेन ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. यादरम्यान युवती हनुमान चालीसेचा जप करत होती. तीन तास चाललेल्या संपूर्ण कारवाई दरम्यान, युवती पूर्णपणे जागरूक राहिली.

Woman recites Hanuman Chalisa
Woman recites Hanuman Chalisa
author img

By

Published : Jul 24, 2021, 4:38 PM IST

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठे रुग्णालय असणाऱ्या एम्सच्या न्यूरो सर्जरी विभागात गुरुवारी रात्री 25 वर्षीय महिलेवर ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया भूल न देता करण्यात आली. विशेष म्हणजे महिला सर्जरी करतेवेळी हनुमान चालिसाचा जप करत होती व डॉक्टर तिच्यावर ब्रेन ट्युमरची सर्जरी करत होते. डॉक्टर सर्जरी करताना मध्ये-मध्ये महिलेला हनुमान चालिसाचा जप करण्यात मदत करत होते. महिला खूप महिन्यापासून डोकेदुखीच्या समस्येने पीडित होती. तपासणी केल्यानंतर समजले की तिला ब्रेन ट्यूमर आहे.

तीन तास चाललेल्या संपूर्ण कारवाई दरम्यान, युवती पूर्णपणे जागरूक राहिली. रुग्णालयाच्या अग्रगण्य डॉक्टरांच्या पथकाने तिची न्यूरो सर्जरी केले. शस्त्रक्रियेच्या महत्त्वपूर्ण भागादरम्यान, ती युवती संपूर्ण हनुमान चालीसाचे पठण करताना दिसली. ऑपरेशन टीमचा एक भाग असलेले डॉ दीपक गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

महिला हनुमान चालिसा पाठ करताना
यापूर्वीही रुग्णाला भूल न देता सर्जरी करण्यात आली आहे. एम्समध्ये 2002 नंतर ब्रेन संबंधित सर्जरी जागृत अवस्थेत केल्या जात आहेत. एम्सचे डॉक्टर सांगतात की, ब्रेन संपूर्ण शरीराचे नियंत्रण करतोत्यामुळे ऑपरेशन करताना ही काळजी घ्यावी लागते की, मेंदूच्या न्यूरॉनशी छेडछाड न होईल. यामुळे रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) च्या न्यूरो सर्जरी डिपार्टमेंटमध्ये गुरुवारी रात्री ज्या महिलेवर सर्जरी करण्यात आली ती पेशाने शिक्षिका आहे. महिलेच्या मेंदूला डाव्या बाजुला मोठी गाठ होती. सर्जन जेव्हा ही गाठ काढत होते त्यावेळी ती हनुमान चालिसाचा पाठ करत होती. यावेळी ऑपरेशन टीममधील कोणीतरी याची व्हिडिओ क्लिप बनवली व ही व्हायरल केली. ऑपरेशन केल्यानंतर महिलेने आपले केस शॅम्पूने धुतले व कोणत्याही त्रासाशिवाय ती ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.