ETV Bharat / bharat

Bomb threat call: दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, विमानतळावर उडाला गोंधळ - पुणे विमान बॉम्ब धमकी

विस्तारा एअरलाइन्सच्या दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिल्ली विमानतळावर मिळाली. मात्र तपासात पोलिसांना काहीही संशयास्पद सापडले नाही.

Bomb threat call
दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी
author img

By

Published : Aug 18, 2023, 1:08 PM IST

Updated : Aug 18, 2023, 1:22 PM IST

नवी दिल्ली : दिल्ली-पुणे विस्तारा विमानात शुक्रवारी दिल्ली विमानतळावर बॉम्बची धमकी मिळालीयं. विमानतळावरील आयसोलेशन बे येथे विमानाची तपासणी करण्यात आलीयं. तत्पूर्वी, सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुरक्षितपणे उतरवण्यात आलयं. जीएमआर कॉल सेंटरला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला. मात्र, विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. या घटनेबाबत सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यूके ९७१ क्रमांकाचे विस्तारा विमान आज सकाळी साडेआठ वाजता हे विमान दिल्लीहून पुण्यासाठी रवाना होणार होते. त्यात प्रवासीही चढले होते. तेव्हाच बॉम्ब असल्याची अफवा पसरली. यानंतर प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

  • Bomb threat on Delhi-Pune Vistara flight at Delhi airport. Inspection of the aircraft is underway in the isolation bay at the airport. All passengers along with their luggage have been deboarded safely. A call regarding a bomb on the flight was received by the GMR call centre…

    — ANI (@ANI) August 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नेमके काय घडले?- जीएमआर ग्रुप संचालित कॉल सेंटरला दिल्ली-पुणे विस्तारा फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा कॉल आला. हे विमान आज सकाळी साडेआठ वाजता पुण्याला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावरून उड्डाण करणार होते. त्यापूर्वीच दिल्ली विमानतळावर एकच गोंधळ उडाला. सुरक्षा एजन्सीने विमानाची तपासणी केली असताना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. विमानात 100 हून अधिक प्रवासी होते. बॉम्बची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांचे सामान विमानातून उतरवण्यात आले. अचानक विमान उड्डाण रखडल्याने प्रवाशी त्रस्त झाले. बॉम्बची धमकी मिळाली असल्याने सुरक्षेच्या उपाय योजनांना सहकार्य करण्याच्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत.

अंतिम मंजुरी मिळताच विमान रवाना होणार- सध्या, विमान प्रवासी टर्मिनल बिल्डिंगमध्ये आहेत. त्यांना ब्रेकफास्ट देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून अंतिम मंजुरी मिळताच विमान पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. यापूर्वीही मुंबई पोलिसांना मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

हेही वाचा-

  1. Bomb Blast Planning : देशातील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाचा होता कट; पुण्यातील दहशतवाद्यांच्या चौकशीत मोठे खुलासे
  2. Mumbai News: विद्यार्थ्यांच्या दप्तरात बॉम्ब असल्याचा शाळेत आला फोन; नालासोपाऱ्यात खळबळ

Last Updated : Aug 18, 2023, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.