नवी दिल्ली : बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यावर विमानाला सुरक्षितस्थळी नेण्यात आले. अशा स्थितीत बॉम्बचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस आणि सीआयएसएफ सतर्क झाले होते. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी साडेसहा वाजता विमान पुण्याला जाणार होते. त्यानंतरच त्यामध्ये बॉम्ब असल्याची माहिती एका फोनवरून पोलिसांना मिळाली होती. यानंतर विमानात प्रवाशी बसणे बंद करण्यात आले, त्यानंतर बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून शोध मोहीम हाती घेण्यात आली. बराच वेळ होऊनही तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही.
सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली : या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांना बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिस अलर्ट मोडवर होते. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही, परंतु SOP नुसार, सुरक्षेतेचे पूर्णपणे पालन केले जात आहे. विशेष म्हणजे याआधीही मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर विमानाचे जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.
गोवा एटीसीला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती : या आधीही दहा जानेवारी रोजी गोवा एटीसीला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटला गुजरातमधील जामनगरला वळवण्यात आले होते. विमानाची तपासणी करण्यात आला होती. जामनगर विमानतळावर एका रशियन दूतावासाने अधिकाऱ्यांना ही महिती दिली होती. मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व 244 प्रवाशांना उतरवण्यात आले होते. फ्लाईटचे विमानतळावर लँडिंग करण्यात आले होते. घटनास्थालवर स्थानिक पोलिसांसह रुग्णवाहिका आणि बॉब्मशोधक पथक दाखले होऊन विमानाची कसून चौकशी करण्यात आली होती. सर्व प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात आले होते.
दूतावासाला सतर्क करण्यात आले : विमानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या अझूर एअरच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती रशियन दूतावासाने भारतीय अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यावेळी जामनगर भारतीय हवाई दलाच्या तळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. तसेच गोवा एटीसीला मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सुरक्षा कडक करण्यात आली होती. चार्टर्ड फ्लाइट गुजरातमधील जामनगरला वळवण्यात आले होते.