नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात अनेक गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात कोरोनाचे उपचार केल्यानंतर पाच रुग्णांमध्ये साइटोमेगालो विषाणूचे (cytomegalovirus-cmv) इन्फेक्शन झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या रुग्णांना रक्तस्रावही झाल्याचे लक्षण दिसले आहे.
पोटदुखीनंतर रुग्णालयात दाखल -
सर गंगाराम रुग्णालयातील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर गैस्टोएंटरोलॉजी एंड पैन्क्रिएटिकोबिलरी साइंसेसचे चेअरमन प्रोफेसर अनिल अरोड़ा यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 45 दिवसात सीएमवी पाच रुग्ण समोर आले आहेत. या पाच रुग्णांना कोरोनाच्या उपचारानंतर 20 ते 30 दिवसांत पोटदुखी, रक्तस्त्राव अशी समस्या उद्भवू लागल्या. यानंतर त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ही लक्षणे कोरोनाचे नाहीत. तसेच हे रुग्ण ट्रान्सप्लांट, कॅन्सर, एड्स सारख्या आजारांनी देखील त्रस्त नव्हते.
हेही वाचा - अँटिबॉडी तयार झाल्या नाहीत, अदर पूनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात कोर्टात अर्ज
रोगप्रतिकारक क्षमता महत्त्वाची -
डॉ. अरोड़ा यांनी सांगितले की, कोरोना विषाणू आणि त्यावरील उपचारासाठी उपयोगात आणली जाणारी औषधी (स्टेरॉइड) रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमत कमी करते. त्यांना साधारण आजारासाठीही संवदेनशील करुते. अशाच प्रकारची साइटोमेगालो विषाणूची लागण आहे. साइटोमेगालो विषाणू 80 ते 90 टक्के भारतीय लोकसंख्येत कोणतेही नुकसान न पोहोचविता उपस्थित राहतो. कारण त्याला वैद्यकीयदृष्ट्या विषाणूला कमजोर करण्याइतकी आपली रोगप्रतिकारक क्षमता इतकी सशक्त नसते.
योग्य वेळी अँटीव्हायरल थेरपीमुळे प्राण वाचू शकतात -
तर रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुनील जैन यांनी सांगितले की, सायटोमेगालो विषाणू कोलायटिसची नोंद पीसीआर चाचणी आणि मोठ्या आतड्यांतील टिशू बायोप्सीच्या माध्यमातून झाली. यासोबतच सीनियर सल्लागार गैस्ट्रोएंटरोलॉजी विभागाचे डॉ. प्रवीण शर्मांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये प्राथमिक उपचार आणि प्रभावी एंटीवायरल थेरेपीच्या माध्यमातून वेळेवर उपचार केल्यास या आजारावर मात केली जाऊ शकते.
पाच रुग्णांमध्ये एकाचा मृत्यू -
डॉ. अनिल अरोड़ा यांनी सांगितले की, सीएमवी विषाणू साधारणत: ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्या रुग्णांमध्ये आढळतो. त्यांनी सांगितले की, ज्या पाच रुग्णांना या विषाणूची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे वय 30 ते 70 दरम्यान आहे.
हेही वाचा - कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे केंद्राला 'सर्वोच्च' निर्देश