ETV Bharat / bharat

BJP Suspends MLA T Raja Singh वादग्रस्त वक्तव्य भोवले, भाजप आमदार टी राजा सिंग पक्षातून निलंबित

author img

By

Published : Aug 23, 2022, 3:18 PM IST

Updated : Aug 23, 2022, 3:31 PM IST

इस्लाम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य controversial remarks targeting Islam केल्याप्रकरणी भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंग यांना पक्षातून निलंबित करण्यात आले BJP Suspends MLA T Raja Singh आहे.

BJP Suspends MLA T Raja Singh
भाजप आमदार टी राजा सिंग पक्षातून निलंबित

हैदराबाद इस्लाम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य controversial remarks targeting Islam केल्याप्रकरणी भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंग यांना पक्षातून निलंबित करण्यात आले BJP Suspends MLA T Raja Singh आहे. तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह यांना भाजप हायकमांडने निलंबित केले आहे. कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते राजा सिंह यांना मंगळवारी येथे अटक करण्यात BJP MLA RAJA SINGH BOOKED आली. या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने त्यांना निलंबित केले. भाजपने त्यांना 10 दिवसांत कारणे दाखवा नोटीस बजावून, त्यांना पक्षातून का काढले जाऊ नये, अशी विचारणा केली आहे.

आज प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी राजा यांनी नुकतेच शहरात सादर केलेल्या स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी Stand Up Comedian Munawwar Farooqui यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ जारी केला. सिंह हे त्यात धर्माविरोधात काही भाष्य करताना दिसत आहेत.

BJP suspends its Telangana MLA T Raja Singh for his controversial remarks targeting Islam
वादग्रस्त वक्तव्य भोवले, भाजप आमदार टी राजा सिंग पक्षातून निलंबित

सिंग यांच्या अटकेची मागणी करत सोमवारी रात्री समाजातील अनेक लोकांनी शहरातील विविध भागात निदर्शने केली. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लीमीन अर्थात एआयएमआयएमचे अनेक आमदार आणि ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेचे नगरसेवक पोलीस ठाण्यात पोहोचले, जिथे निदर्शने करण्यात आली आणि राजा सिंह यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग यांच्याविरोधात दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागांतर्गत अनेक पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. डबीरपूरचे पोलिस निरीक्षक जी कोटेश्वर राव यांनी सांगितले की, त्यांना सिंग यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये भाजप आमदाराने धर्माविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे.

धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे, जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये करणे, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक विश्वासांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असलेल्या आयपीसीच्या विविध कलमांखाली सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

19 ऑगस्ट रोजी, राजा सिंह यांनी स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी यांच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्या दिवशी फारुकी यांच्या कार्यक्रमस्थळी पोहोचून निषेध करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

हेही वाचा BJP MLA RAJA SINGH BOOKED भाजप आमदार टी राजा यांना वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी अटक

Last Updated : Aug 23, 2022, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.