लखनऊ: उत्तर प्रदेशातील कावडधारकांवर फुलांच्या वर्षाव केल्याबद्दल (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी खिल्ली उडवली. योगी सरकारचे नाव न घेता ते म्हणाले की, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होत असेल तर किमान आमच्या घरात घुसू नका. काही वृत्तपत्रांचे फोटो शेअर करत ओवेसींनी लिहिले की ही 'रेवाडी संस्कृती' नाही का? एखाद्या मुस्लिमाने मोकळ्या जागेवर काही मिनिटांसाठीही नमाज अदा केल्यास गोंधळ होतो. मुस्लिम आहेत म्हणून पोलिसांच्या गोळ्या, NSA, UAPA, लिंचिंग आणि बुलडोझरचा सामना ते करत आहेत.
ओवेसींच्या या वक्तव्यावर भाजपने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. आज कावड्यांची व्यवस्था केली जात आहे. मात्र वर्षानुवर्षे मोहरमला ताजिया आणि हज यात्रेत सोय केली जाते. तेव्हा कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही, मग आता का? एआयएमआयएमचे खासदार ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये योगी सरकारला प्रश्न केला आणि लिहिले की, कावड्यांच्या भावना इतक्या कमकुवत आहेत की ते मुस्लिम पोलिसाचे नावही सहन करू शकत नाहीत. हा भेद का? समानता नसावी का? एकाचा द्वेष आणि दुसऱ्यावर प्रेम का? एका धर्मासाठी बुलडोझर आणि दुसऱ्या धर्मासाठी वाहतूक का वळवायची?
'मुस्लिमांचीही काळजी घेतली पाहिजे' ओवेसींनी उत्तर प्रदेशात मुस्लिमांची घरे पाडली जात असल्याचं म्हटलं आहे. त्यांना हेरून कारवाई करण्यात येत असून कावडधारकांवर मात्र फुलांचा वर्षाव केला जात आहे. या कामात सरकारी अधिकारी, कर्मचारी, नेते गुंतले आहेत. मुस्लिमांचीही काळजी घेतली पाहिजे.
'लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न' या ओवेसींच्या विधानाला उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की, श्रावण महिन्यात लाखो लोक भगवान भोलेनाथांच्या जलाभिषेकासाठी पदयात्रा करतात. त्यामुळे सरकार आवश्यक सुविधा पुरवते. त्याचप्रमाणे ताजिया मिरवणूक आणि रोजा इफ्तारची व्यवस्था सरकारकडून करण्यात येत आहे. मग ओवेसी प्रश्न उपस्थित करत नाहीत. ओवेसी प्रश्न उपस्थित करून जातीय विभाजन आणि लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.