ETV Bharat / bharat

J P Nadda Mumbai Visit : जे.पी.नड्डांचा मुंबई दौरा; दलित कार्यकर्त्याच्या घरी मारला जेवणावर ताव - जे पी नड्डा भाजप दलित कार्यकर्ता जेवण

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी आपल्या एका दलित कार्यकर्त्याच्या घरी पाहुणचार घेतला. त्यांच्या प्रवक्त्यांनी तसे आदल्या दिवशी जाहीरच केले होते. नड्डा यांनी घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर या दलित वस्तीत एका कार्यकर्त्याच्या घरी भोजनासाठी हजेरी लावली. दाळ, भात पुरी आणि भाजीचा आस्वाद यावेळी नड्डा यांनी घेतला.

JP Nadda
दलित कार्यकर्ताच्या घरी जेवताना जे पी नड्डा
author img

By

Published : May 17, 2023, 12:25 PM IST

Updated : May 18, 2023, 8:09 PM IST

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा 17 व 18 तारखेला मुंबई व पुणे दौऱ्यावर आले होते. या दोन दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी विविध कार्यकर्त्यांची चर्चा केली आहे. तसेच सरकारच्या विविध योजनांच्या लार्भर्थ्यांची भेट देखील घेतली आहे. नड्डा यांनी मुंबई दौऱ्या दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या भेटीसोबतच विविध प्रभागांमध्ये जाऊन जनतेशी देखील संवाद साधला आहे. दरम्यान, हा कार्यक्रम दुपारचा असल्याने मुंबईच्या घाटकोपर परिसरातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांनी बुधवारी स्नेहभोजन देखील केले आहे. एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आपल्या घरी जेवायला येणार असल्याने या कार्यकर्त्याच्या घरी आनंदाचे वातावरण होते.

कोण आहे तो कार्यकर्ता - जेपी नड्डा ज्या कार्यकर्त्याच्या घरी स्नेहभोजनासाठी आले होते त्या कार्यकर्त्याचे नाव संगतीत मनोहर केदारे असे आहे. हा कार्यकर्ता भाजपचा महामंत्री आहे. घाटकोपरला येणार असल्याने या कार्यकर्त्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासोबतच या कार्यकर्त्याच्या घराबाहेर रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. तसेच घराला फुलांनी सजवण्यात आले होते. केदार यांच्या घरी त्यांचे नातेवाईक देखील आले होते. या सर्वांनी निळे फेटे परिधान केले होते.

एवढा मोठा नेता घरी आला व जेवण केले म्हटल्यावर ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे - वडील मनोहर केदारे

काय होता मेनू - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुधवारी दुपारी मुंबईतील एका दलित कार्यकर्त्याच्या घरी जेवण केले. एकदम साध्या आणि चविष्ट पद्धतीचे जेवण बनवण्यात आले होते. दाळ, भात, पुरी तसेच भाजीची मेजवानी जे पी नड्डा यांच्यासाठी तयार करण्यात आली होती. या सर्व पदार्थांचा आस्वाद जे पी नड्डा यांनी बुधवारी घेतला.

महापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू : राज्यात वर्षाअखेर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनबांधणीसाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा यांचा दौरा महत्त्वाचा होता. मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर जे.पी. नड्डा यांचा मुंबईचा दीड दिवसीय दौरा होता.

मंत्र्यांना मार्गदर्शन : मुंबईतील कार्यक्रम पार पडल्यानंतर जे. पी. नड्डा १८ मे रोजी दुपारी दीड वाजता पुण्याच्या बैठकीसाठी रवाना झाले होते. नड्डा यांनी पुण्यातील खासदार-आमदार तसेच राज्य मंत्रिमंडळातील तसेच राज्यातील केंद्रीय मंत्री यांच्यासोबत स्वंतत्र बैठका घेतल्या. तसेच भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सुमारे दीड हजार सदस्य उपस्थित होते. या बैठकीचा समारोप हा नड्डा यांच्या भाषणाने झाला आहे. या बैठकीत जे. पी. नड्डा यांनी खासदार, आमदारांना मार्गदर्शन केले.हेही वाचा

  1. Narendra Modi To Visit Japan : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेसाठी जपान, ऑस्ट्रेलियासह जाणार चार देशांच्या दौऱ्यावर
  2. Karnataka CM : दिल्लीत घडामोडींना वेग, सिद्धरामय्या-शिवकुमार खरगेंना भेटले
  3. PM Narendra Modi On Rozgar Mela : सरकारचे प्रत्येक धोरण रोजगार निर्मितीचे दार उघडणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Last Updated : May 18, 2023, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.