नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीनंतर 11 राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपाला विजय प्राप्त झाला आहे. या यशानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लुहणू मैदानात सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. एम्स रुग्णालय उभारणीवरून विरोधकांनी टीका केली होती. मात्र, आता एम्स उभारणीचे काम लवकरच पूर्ण होईल. आता एम्सवर विरोधक एक शब्दही बोलत नाहीत, असेही नड्डा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन प्रत्येक वर्गाची काळजी घेतली आहे. मोदी सरकाराने कोरोना काळाताही चांगले काम केले आहे. निवडणुका असल्यामुळे मला दिवाळी उत्सावात बिलासपूरला येणे जमले नाही. मात्र, आता मी सर्वांची भेट घेऊन जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमचलला नेहमीची सन्मान दिला आहे, असे नड्डा म्हणाले.
नड्डा आज बिलासपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांसोबत बैठक करणार आहेत. त्यानंतर साडेचार वाजता ते विजयपूरला रवाना होतील. भाजपाने 2021मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आतापासून कंबर कसली आहे. नड्डा यांनी 100 दिवसांचा प्लान केला असून नड्डा संपूर्ण देशाचा दौरा करणार आहेत. देशातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा - 'जबाबदारीची जाणीव असलेले लोकच जीवनात यशस्वी होतात'