ETV Bharat / bharat

खासदार नुसरत जहाँ यांच्या विवाहाचा प्रश्न पोहोचला थेट संसदेत!

भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्या यांनी लोकसभेच्या खासदार ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात नुसरत जहाँ यांनी विवाहाची चुकीची माहिती दिल्याचे म्हटले आहे. त्याबाबत योग्य तपास करावा, असे खासदार संघमित्रा यांनी पत्रात नमूद केले आहे.

Nusrat Jahan
खासदार नुसरत जहाँ
author img

By

Published : Jun 22, 2021, 3:52 PM IST

कोलकाता - तृणमूल पक्षाच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या वैवाहिक जीवनाचा मुद्दा थेट संसदेत पोहोचला आहे. भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्या यांनी लोकसभेच्या खासदार यांना पत्र लिहून नुसरत जहाँ यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्या यांनी लोकसभेच्या खासदार ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात नुसरत जहाँ यांनी विवाहाची चुकीची माहिती दिल्याचे म्हटले आहे. त्याबाबत योग्य तपास करावा, असे खासदार संघमित्रा यांनी पत्रात नमूद केले आहे.

Nusrat Jahan
नुसरत जहाँ

हेही वाचा-स्कँडल प्रकरण : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

खासदार नुसरत यांनी निखिल जैनवर केले आहेत आरोप-

अभिनय क्षेत्रातून राजकारणात एन्ट्री घेतलेली बंगाली अभिनेत्री तसेच आता तृणमूल काँग्रेसची खासदार जहाँ यांच्या विवाहाची सध्या चर्चा आहे. निखिल जैनसोबत कोणतेही वैवाहिक संबंध नसून त्याच्यापासून विभक्त होत असल्याचे नुसरत जहाँ यांनी सांगितले होते. 2019 मध्ये दोघांनी केलेलं लग्न अवैध असल्याचा मोठा खुलासाही त्यांनी केला. पैशाचा दुरुपयोग, दागिने आणि अन्य संपत्ती अवैधरित्या निखिलने घेतली असल्याचा खासदार नुसरत जहाँ यांनी आरोप केला होता.

हेही वाचा-लोणी प्रकरण : ट्विटरच्या एमडीला २४ जूनला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश

लग्न ठरले अवैध...

निखिल आणि नुसरत यांचे लग्न तुर्की विवाह नोंदणी अंतर्गत झाले होते. हे लग्न दोन वेगवेगळ्या धर्मीय लोकांचे होते. त्यामुळे सामाजिक विवाह कायद्यानुसार लग्नाची अधिकृत नोंदणी गरजेची होती. नोंदणी न झाल्याने तुर्कीत पार पडलेल्या लग्नाला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे नुसरत यांनी सांगितले आहे. तसेच आतापर्यंत आम्ही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो, असेही त्यांनी सांगितले.

स्टायलिश खासदार म्हणून नुसरत यांची ओळख

नुसरत यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश घेतल्याने संसदेतील स्टायलिश खासदार म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या सौंदर्याची आणि स्टाईल स्टेटमेंटची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. उद्योगपती असलेल्या निखिल जैनशी 'तुर्की' येथे नुसरत यांनी 19 जून 2019 लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हारल झाला होता. लग्नानंतर नुसरत आणि निखिल यांचा रिसेप्शन सोहळा 4 जुलैला कोलकातामध्ये पार पडला होता. मात्र, हे लग्न अवैध नसल्याचे माहिती झाल्याने चाहत्यांना धक्का बसला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.