रायपूर Giriraj Singh Anti Hindu : अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवरून सुरू असलेलं राजकारण थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. काँग्रेसनं या घटनेला राजकीय असल्याचं यावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर आता भाजपानं काँग्रेसला हिंदूविरोधी ठरवलंय. हिंदूविरोधी परंपरा काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे, असं केंद्रीय मंत्री आणि बिहारच्या बेगुसरायचे खासदार गिरिराज सिंह म्हणाले. ते सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत.
काय म्हणाले गिरिराज सिंह : "राम मंदिर ट्रस्टनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवलं आहे. परंतु हे लोक येणार नाहीत, कारण ते हिंदूविरोधी आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीबाबत पंडित नेहरूंनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचाही क्लास घेतला होता. राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती होते. त्यांनाही नकार देण्यात आला. कारण नेहरू म्हणायचे की मी बाय डिफॉल्ट हिंदू आहे. ही हिंदूविरोधी परंपरा त्यांच्या डीएनएमध्ये आहे", असा हल्लाबोल गिरिराज सिंह यांनी केला.
सुशील मोदी यांची नाव न घेता टीका : "जे लोकं निमंत्रण मिळूनही रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकतायेत, त्यांचा फैसला रामभक्त जनता घेईल", असा सूचक इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी कुणाचंही नाव न घेता दिला.
काँग्रेसची भूमिका काय : काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक पत्र जारी करून काँग्रेस पक्ष आणि नेते राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलंय. तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनी या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय घटना म्हटलंय. यावरून भाजपावर सातत्यानं टीका होतेय.
हे वाचलंत का :