ETV Bharat / bharat

Gautam Gambhir : गौतम गंभीरला ठार मारण्याची आईएसआईएसकडून धमकी - आईएसआईएस काश्मीर

भाजप खासदार गौतम गंभीरला ( BJP MP Gautam Gambhir ) ' आईएसआईएस काश्मीर' या संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबतची तक्रार गौतम गंभीरने दिल्ली पोलिसात केली आहे.

former Cricketer Gautam Gambhir
गौतम गंभीर
author img

By

Published : Nov 24, 2021, 12:33 PM IST

Updated : Nov 24, 2021, 1:12 PM IST

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ( Gautam Gambhir ) ' आईएसआईएस काश्मीर' या संघटनेने जीवे मारण्याची धमकी ( Gautam Gambhir received death threats from ISIS Kashmir ) दिली आहे. याबाबतची तक्रार गौतम गंभीरने दिल्ली पोलिसात केली आहे.

डीसीपी (मध्य) श्र्वेता चौहान ( DCP Shweta Chauhan ) यांनी सांगितले की, माजी क्रिकेटर गौतम गंभीर याला ' आईएसआईएस कश्मीर ' ने जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तपासणी सुरू आहे. गंभीर याच्या निवासस्थान बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

माहितीनुसार, गंभीर याला ई-मेल व्दारे ही धमकी दिली गेली आहे.

क्रिकेटर पासून नेता झालेले गौतम गंभीर हे राष्ट्रीय सुरक्षा, कश्मीर आणि अन्य मुद्द्यांवर निर्भिडपणे मांडलेल्या मतांबद्दल नेहमीच चर्चेत राहतात.

गंभीरने मागील काही दिवसांपूर्वी पंजाब काॅंग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना 'बड़ा भाई' म्हटले होते. यावर त्यांनी टीका केली होती. यावेळी गंभीरने पाकिस्तानला आतंकवादी देश म्हटले होते.

हेही वाचा - Cryptocurrency संसदेच्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोचलनाच्या नियमनाकरिता विधेयक होणार सादर

Last Updated : Nov 24, 2021, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.