ETV Bharat / bharat

'लिव्ह इन रिलेशनशिप' एक आजार; त्याला वेळीच आळा घाला, भाजपा खासदाराची मागणी - BJP MP Demand

BJP MP Demand: भाजपाचे खासदार धरमवीर सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत 'लिव्ह-इन' संबंधांवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली. प्रेमविवाहात पालकांची संमती अनिवार्य करावी, असे देखील ते म्हणाले. (BJP MP Dharamveer Singh)

BJP MP Demand
भाजपा खासदार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 9:09 PM IST

नवी दिल्ली BJP MP Demand: देशात 'लिव्ह-इन' (Live in relationship) संबंधांवर बंदी घालण्यासाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणी भाजपाच्या एका खासदाराने गुरुवारी लोकसभेत केली. प्रेमविवाहात (love marriage) पालकांची संमती अनिवार्य करावी, असेही ते म्हणाले. हरियाणातील भिवानी-महेंद्रगड येथील लोकसभा सदस्य धरमवीर सिंह यांनीही खालच्या सभागृहात शून्य तासात सांगितले की, देशात प्रेमविवाह वाढल्यामुळे घटस्फोटाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे देशाची संस्कृती नष्ट होत आहे, असा दावा त्यांनी केला. (parental consent in love marriage)

घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती : धरमवीर सिंह म्हणाले की, भारतीय समाजात पारंपरिकपणे कुटुंबांद्वारे विवाह लावले जातात. ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांचीही संमती असते. ते म्हणाले की, अशा नात्यांमध्ये कौटुंबिक पार्श्वभूमीलाही प्राधान्य दिले जाते. गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि पाश्चात्य देशांसारख्या देशात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रेमविवाह असल्याचं त्यांनी सांगितलं.

दोन्ही पक्षांची संमती अनिवार्य : भाजपा खासदार म्हणाले की, अशा संबंधांमध्ये नंतर भांडणे वाढतात आणि दोन्ही बाजूंची 'कुटुंबं' उद्ध्वस्त होतात. प्रेमविवाहाच्या बाबतीत मुलगा आणि मुलीच्या पालकांची संमती आणि दोन्ही पक्षांची संमती अनिवार्य करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. सिंह म्हणाले की, पाश्चात्य देशांप्रमाणेच भारतातही 'लिव्ह-इन' रिलेशनशिपसारखी सामाजिक दुष्प्रवृत्ती वाढत आहे. ज्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.

देशाची संस्कृती नष्ट होत आहे: 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याच्या प्रवृत्तीमुळे आपली संस्कृती नष्ट होत आहे. खासदार धरमवीर सिंह म्हणाले की, जर असेच चालू राहिले तर ज्या सभ्यता आणि संस्कृतीसाठी आपण ओळखलो जातो ती एक दिवस संपेल. 'लिव्ह इन रिलेशनशिप' थांबवण्यासाठी देशात कायदा करायला हवा, असे मत त्यांनी मांडले.

हेही वाचा:

  1. फडणवीसांची नवाब मलिक यांच्या नावावर महायुतीमध्ये घेण्यास फुली; देश महत्त्वाचा म्हणत अजित पवारांना दिलं पत्र
  2. देवेंद्रभाऊ, सरडेसुद्धा लाजून आत्महत्या करतील, सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
  3. वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांमध्ये आजारात वाढ, आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.