ETV Bharat / bharat

महुआ मोईत्रा यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस - महुआ मोईत्रा लेटेस्ट न्यूज

भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे आणि पी.पी चौधरी यांनी महुआ मोईत्रा यांच्या विरोधात लोकसभेत विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली आहे.

महुआ मोईत्रा यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस

author img

By

Published : Feb 11, 2021, 10:43 PM IST

नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या त्यांच्या लोकसभेतल्या भाषणामुळे जोरदार चर्चेत आल्या आहेत. लोकसभेत राष्ट्रपती अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना महुआ मोईत्रा यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर टिप्पणी केली होती. त्यावर भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे आणि पी.पी चौधरी यांनी महुआ मोईत्रा यांच्या विरोधात लोकसभेत विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली आहे.

सभागृह सभापतींना दोन्ही नेत्यांनी पत्र लिहलं आहे. 8 फेब्रुवारी 2021 रोजी खासदार महुआ मोइत्रा यांनी माजी सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई यांच्या कर्तव्य बजावण्याच्या कार्यप्रणालीबाबत सभागृहात भाष्य केले. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 121 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वर्तनाबाबत संसदेत चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. विशेषाधिकारांचे हेतुपुरस्सर उल्लंघन केल्याच पत्रात म्हटलं आहे.

सेवानिवृत्त न्यायाधीशांवर सभागृहात चर्चा होऊ शकत नाही. सभागृहात सध्याच्या आणि सेवानिवृत्त न्यायाधीशांवर आरोप लावले जाऊ शकत नाही. जर एखादा सदस्य नियमांविरूद्ध बोलला तर विशेषाधिकार भंगाचा खटला बनविला जातो. महुआ मोइत्रा यांची टिप्पणी रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आली आहे, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक ही टिप्पणी केली होती. ते अद्याप सोशल मीडियावर उपलब्ध आहे, असे असे पीपी चौधरी म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या महुआ मोईत्रा -

महुआ मोईत्रा यांनी माजी सरन्यायाधीशांवर टिप्पणी केली होती. न्यायपालिकाही पवित्र राहिलेली नाही. केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन निर्णय दिले जातात. दबावाखाली येऊन गोगोई यांनी राम मंदिरावर निर्णय दिला, असा आरोप महुआ मोईत्रा यांनी केला. तसेच महुआ मोईत्रा यांनी नाव न घेता माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर झालेल्या बलात्कारासारख्या एका गंभीर आरोपाचाही उल्लेख केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.