ETV Bharat / bharat

BJP MLA With Oxygen Cylinder In Assembly : वाढत्या प्रदूषणावर भाजप आमदारांचे अनोखे निदर्शन, विधानसभेत चक्क ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचले!

राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या गंभीर स्थितीवर भाजप आमदारांनी आज विधानसभेत अनोखे निदर्शने केले. भाजप आमदार ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर घेऊन दिल्ली विधानसभेत पोहोचले. याद्वारे त्यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

BJP MLA With Oxygen Cylinder In Assembly
आमदार विधानसभेत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचले
author img

By

Published : Jan 16, 2023, 6:24 PM IST

भाजप आमदार विधानसभेत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचले

नवी दिल्ली : भाजपचे आमदार आज दिल्ली विधानसभेत ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर घेऊन पोहचले. दिल्लीतील प्रदूषणाबाबत सरकार कोणतीही काळजी घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासोबतच या आमदारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.

विधानसभेत दिल्लीच्या प्रदूषणाचा मुद्दा उठवला : भाजप आमदारांनी विधानसभेत दिल्लीच्या प्रदूषणाचा मुद्दा उठवला आहे. सोमवारी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले तेव्हा भाजपचे सर्व आमदार ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मास्क घालून विधानसभेत पोहोचले. त्यांनी दिल्लीतील प्रदूषणाचा निषेध व्यक्त केला. यामुळे दिल्ली सरकार प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याचा संदेश जाई, असे त्यांचे म्हणणे आहे.

दिल्लीतील जनता गुदमरलेल्या वातावरणात जगते आहे : यावेळी भाजप आमदार ओपी शर्मा म्हणाले की, 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर ते वारंवार हा मुद्दा मांडत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांना यात रस नाही. त्यामुळे दिल्लीतील जनतेला गुदमरलेल्या वातावरणात जगावे लागत आहे'. या मुद्यावर भाजप आमदार अनिल वाजपेयी म्हणाले की, 'देशातील इतर महानगरांमध्ये वाहनांची संख्या अधिक आहे मात्र तरीही प्रदूषणग्रस्त शहरांच्या यादीत त्या शहरांची नावे येत नाहीत. नुकताच देशातील सर्व शहरांमधील प्रदूषणाच्या पातळीवर प्रकाशित झालेल्या अहवालात दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. ज्या देशाच्या राजधानीत सर्व काही चांगलं असायला हवं, त्या राजधानीचीच हवा प्रदूषित आहे, ही शरमेची बाब आहे'.

मार्शल द्वारा सिलेंडर बाहेर काढण्यात आले : सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा भाजपचे आमदार ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन मास्क घालून आले तेव्हा विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर बाहेर ठेवण्याच्या सूचना केल्या. मात्र, आमदारांनी त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर मार्शलच्या माध्यमातून सर्व ऑक्सिजन सिलिंडर बाहेर काढून विधानसभेचे कामकाज सुरू करण्यात आले. विधानसभेचे कामकाज सुरू होताच आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी सरकारी कामात नायब राज्यपालांच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून आपच्या इतर आमदारांनी एकत्र बोलायला सुरुवात केली. यामुळे उडालेल्या गोंधळाने विधानसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले होते.

हेही वाचा : Mayawati On EVM : ईव्हीएम मुद्द्यावरुन मायावतींचे पुन्हा रडगाणे, म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.