ETV Bharat / bharat

'राहुल गांधींमध्ये पीएम नाही, तर प्यून बनण्याची क्षमता'; भाजपाच्या आमदाराची टीका - सुरेंद्र सिंह यांचे वादग्रस्त विधान

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींमध्ये पीएम नाही, तर प्यून बनण्याची क्षमता आहे, अशी टीका त्यांनी केली.

Surendra Singh - Rahul Gandhi
सुरेंद्र सिंह -राहुल गांधीं
author img

By

Published : May 14, 2021, 4:15 PM IST

बलिया - जिल्ह्यातील बैरिया विधानसभेतील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. राहुल गांधी भाग्याने पंतप्रधान झाले तर होतील. राहुल गांधींमध्ये पीएम नाही. तर प्यून बनण्याची क्षमता आहे. नाहीतर राहुल यांची कोणतीही पात्रता नाही. त्यांची काय योग्यता आहे, हे संपूर्ण देश जाणून आहे, अशी टीका सुरेंद्र सिंह यांनी केली.

बलियामधील आमदार सुरेंद्र सिंह

जोपर्यंत भारतात नरेंद्र मोदी आहेत. तोपर्यंत दुसरा कोणी पंतप्रधान होऊच शकत नाही, असेही सुरेंद्र सिंह म्हणाले. तसेच सुरेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांचे वर्णन मुस्लिम व्यक्ती असे केले. मुस्लीम तुष्टीने राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात. परंतु देशातील जनता त्यांना पंतप्रधान म्हणून कधीच स्वीकारणार नाही. राहुल गांधींना राजकीय विचारसरणी नाही, ते देशासाठी काय करतील? राहुल गांधी यांना फक्त ट्विट करणेच माहित आहे, कदाचित त्यांनी टि्वट करण्यासाठी सुद्धा एखादा इटालियन व्यक्ती भाड्याने घेतला असेल, अशी टीका सिंह यांनी केली.

आमदार सुरेंद्र सिंह यांनी राहुल गांधींना अज्ञानीही म्हटलं. राहुल गांधींना फक्त ट्विट करून व्यवसाय कसा करायचा हे माहित आहे. राहुल गांधींबद्दल बोलून आपण वेळ खराब करत आहोत. त्यांना देशाची चिंता नाही, त्यांना फक्त स्व:ताची चिंता असून ते अनावश्यक ट्विट करत असतात, असेही सुरेंद्र सिंह म्हणाले.

वादग्रस्त विधानांसाठी सुरेंद्र सिंह प्रसिद्ध -

सुरेंद्र सिंह यांनी बलात्कार प्रकरणी बोलताना अकलेचे तारे तोडले होते. लोकांनी आपल्या मुलींवर चांगले संस्कार केले, तर बलात्कारासारख्या घटना थांबू शकतात, असे ते म्हणाले होते. तसेच गोमूत्र पिल्यामुळे कोरोनाची लागण होत नाही, असाही दावा त्यांनी केला होता.

हेही वाचा - आणखी एका भाजप आमदाराची मुक्ताफळे; म्हणे 'पालकांनी मुलींना संस्कार शिकवले तर बलात्कार थांबतील'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.