मेरठ (उत्तरप्रदेश) : भाजप नेता श्रीकांत त्यागीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे (BJP leader Shrikant Tyagi arrested). यूपी पोलीस सतत त्याचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी सकाळी त्याला पोलिसांनी पकडले. नोएडा पोलिसांनी श्रीकांत त्यागी याची आणखी एक कार जप्त केली असून त्यावर उत्तर प्रदेश विधानसभेचे स्टिकर आहे.
कारवाईची मागणी - 6 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये भाजप नेते श्रीकांत त्यागी एका महिलेवर ओरडताना आणि तिला शिवीगाळ करताना दिसले. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर २४ तासांच्या आत नोएडाच्या ग्रँड ओमॅक्स सोसायटीत १५ जणांनी जबरदस्तीने प्रवेश केला आणि पीडितेच्या कुटुंबाला धमकावले. यानंतर खासदार महेश शर्मा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली.
त्यागी यांच्या घरावरील बेकायदा बांधकाम पाडण्यात आले: दुस-या बाजूला दबाव निर्माण करण्यासाठी नेते त्यागी यांच्या घरावरील बेकायदा बांधकाम पाडण्यात आले. त्यांच्या भणगे येथील दुकानांवरही जीएसटीचे छापे टाकण्यात आले. या प्रकरणाची स्वतः दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.