नवी दिल्ली: राहुल गांधींनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर लगेचच भाजप नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी राहुल गांधी घाबरलेले आहेत, असे म्हणत प्रत्युत्तर दिले. महागाई, बेरोजगारी यावर सभागृहात चर्चा होत असताना ते येत नाहीत. सदनामधून बाहेर निघून जातात. राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही, असे ते खोटे का बोलले? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देशाला दिले पाहिजे असेही प्रसाद म्हणालेत (Rahul Gandhi about democracy).
-
LIVE: Media Briefing by Shri @rsprasad in New Delhi. https://t.co/rADHklnxzL
— BJP (@BJP4India) August 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">LIVE: Media Briefing by Shri @rsprasad in New Delhi. https://t.co/rADHklnxzL
— BJP (@BJP4India) August 5, 2022LIVE: Media Briefing by Shri @rsprasad in New Delhi. https://t.co/rADHklnxzL
— BJP (@BJP4India) August 5, 2022
राहुल गांधी खोटे - प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी खोटे बोलत आहेत. ते जामिनावर बाहेर असल्याचे त्यांनी देशाला सांगावे. राहुल गांधींची पत्रकार परिषद आम्ही नुकतीच पाहिली, असे प्रसाद यांनी सांगून त्यामध्ये ते घाबरले असल्याचे दिसते असेही प्रसाद म्हणाले. महागाई आणि बेरोजगारीची चर्चा हे निमित्त आहे. मुळात त्यांचेच ईडीला धमकावणे सुरू आहे. ते पुढे म्हणाले की राहुल गांधींना काय बोलावे. त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. बड्या संपादकांना तुरुंगात पाठवले. राहुल गांधी आम्हाला एका गोष्टीचे उत्तर द्या तुमच्या पक्षात लोकशाही आहे का?, असा सवालही प्रसाद यांनी केला.
राहुल गांधी काय म्हणाले - या देशात लोकशाहीचा मृत्यू होत असल्याचे आपण पाहत आहोत, अशी विखारी टिका राहुल गांधी यांनी केली. जवळपास शतकापूर्वीपासून सुरू झालेल्या भारताने जे कमाविले आहे ते तुमच्या डोळ्यांसमोर नष्ट होत आहे. हुकूमशाही सुरू करण्याच्या या कल्पनेच्या विरोधात जो कोणी उभा राहतो त्याच्यावर हल्ले केले जातात, तुरुंगात टाकले जाते, अटक केली जाते आणि मारहाण केली जाते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
देशात हुकुमशाही सुरू - काँग्रेसने ७० वर्षांत देशासाठी जे काही कमविले आहे ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ८ वर्षात गमाविले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. देशात हुकुमशाही सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. दरम्यान, महागाई विरोधात काँग्रेसने आजपासून देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेने करण्यात आली.
हेही वाचा - Congress nationwide protest: काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, पोलिसांचा इशारा