आगरतळा - ज्येष्ठ नेते आणि तृणमूल काँग्रेसचे त्रिपुरा प्रभारी राजीव बॅनर्जी यांनी राज्यात लोकशाहीचा मृत्यू आहे अशी खंत व्यक्त करत 'भाजपसमर्थित गुंडांनी' राज्यभर भीतीचे वातावरण पसरवले आहे असे मत ज्येष्ठ नेते आणि तृणमूल काँग्रेसचे त्रिपुरा प्रभारी राजीव बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, 'आमच्या संस्थेचे काम जोरात सुरू आहे. ठिकठिकाणी आमचे कार्यकर्ते झेंडे आणि बॅनर लावत आहेत. मात्र, त्रिपुरामध्ये 'लोकशाहीचा मृत्यू झाला' हे अत्यंत दुर्दैवी आहे. (Tripura Agartala TMC BJP) भाजप विरोधी राजकीय पक्षाला फॅसिस्ट मार्गाने दाबण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. आम्हाला परवानगी मिळाली आहे यात शंका नाही पण आमचे कार्यकर्ते, नेते आणि विविध भागात टीएमसीचे समर्थक कालपासून विरोध आणि धमक्यांना तोंड देत आहेत असही ते म्हणाले आहेत. भाजपने भीतीचे मनोविकार पसरवले. ते आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि वाहन चालकांना उद्या टीएमसीच्या रॅलीला आणि जाहीर सभेला उपस्थित राहू नये, अशी धमकी देत आहेत असा गौप्यस्पोटही त्यांनी केला आहे.
लोकांसाठी आमचे आंदोलन सुरूच ठेवू - राजीव बॅनर्जी म्हणाले की, 'भाजप समर्थित गुंड टीएमसी कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. हे अतिशय दुःखद आहे. धलाई, उनाकोटी, उत्तर जिल्हा, दक्षिण जिल्हा आणि गोमती जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत. काही ठिकाणी वाहनचालकांनी धमक्या आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना नेण्यास नकार दिला. मात्र, आम्ही थांबणार नाही, लोकांसाठी आमचे आंदोलन सुरूच ठेवू. आमच्या कार्यक्रमाला खासदार काकली घोष दस्तीदास आणि खासदार महुआ मोईत्रा उपस्थित राहणार आहेत असही त्यांनी सांगितले आहे.
विकासासाठी काम करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट - पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या खासदार सुष्मिता देव यांनीही या घटनेचा निषेध केला आणि त्या म्हणाल्या, "ज्या प्रकारे ते आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत, 14 नोव्हेंबरच्या जनसभेला उपस्थित न राहण्याची धमकी देत आहेत, मी भाजपच्या या कृतीवर टीका केली आहे." हा लोकशाही देश आहे आणि प्रत्येक पक्षाला समान अधिकार आहेत. त्रिपुराच्या विकासासाठी काम करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे असही ते म्हणाले आहेत.