ETV Bharat / bharat

Waging war on Indian Muslims : भाजप द्वेष निर्माण करत भारतीय मुस्लिमांवर युद्ध छेडत आहे - ओवेसी यांचा आरोप

भाजपवर देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण केल्याचा (BJP creating hatred) आरोप करत, एआयएमआयएम (AIMIM ) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) यांनी आरोप केला की, भाजप आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्याविरुद्ध युद्ध (waging war on Indian Muslims) पुकारले आहे.

Asaduddin Owaisi
असदुद्दीन ओवेसी
author img

By

Published : Apr 30, 2022, 10:44 AM IST

हैदराबाद: भाजपवर देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण करत असल्याचा आरोप करत, एआयएमआयएम ( All-India Majlis-e-Ittehadul Muslimeen ) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आरोप केला आहे की, भगवा पक्ष आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजाविरुध्द युद्ध पुकारले आहे. ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्वेषाच्या घटना थांबवा त्यामुळे देश कमकुवत होत असे सांगितले आहे.

"आपल्या देशात भाजपने मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वादळ निर्माण केले आहे. मुस्लिमांनो संयम आणि धैर्य गमावू नका. संविधानात राहून या दडपशाहीशी लढा, असे आवाहन ओवेसी यांनी केले आहे. 'जलसे यौम-उल-कुराण'ला संबोधित करताना. येथील मक्का मस्जिद परिसरात जुमात उल-विदा (रमझानचा शेवटचा शुक्रवार) निमित्त ओवेसी म्हणाले, "भाजपला मुस्लिमांवर इतका दबाव आणायचा आहे, त्यांना दुखवायचे आहे जेणेकरून ते शेवटी शस्त्र उचलतील..."

"आम्ही पंतप्रधानांना हा द्वेष थांबवायला सांगतो. यामुळे देश कमकुवत होत आहे. तुमचा पक्ष आणि तुमच्या सरकार - राजवटीने भारतीय मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. खरगोन शहर आणि मध्य प्रदेशातील सेंधवा येथे मुस्लिमांची घरे पाडण्यात आली. मुस्लिमांवर बहिष्कार टाका आणि त्यांच्या दुकानातून खरेदी करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. असा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.

नुकतेच हरियाणामध्ये, स्वतःला 'गौ रक्षक' (गोरक्षक) म्हणवून घेणाऱ्यांनी एका वृद्धाची दाढी पकडून त्याला मारहाण केली. त्याचप्रमाणे, आणखी एका व्यक्तीला त्याच्या घरातून पळवून नेण्यात आले, त्याने एक गाय कापली असा आरोप केला गेला आणि त्यालाही मारहाण करण्यात आली. "आम्हाला माहित आहे की आपल्या देशात अनेक घटना घडत आहेत. मला अनेक फोन येतात आणि लोक मला सांगतात, आमची घरे आणि दुकाने पाडली जात आहेत. आम्हाला उद्ध्वस्त केले जात आहे. काही म्हणतात की ते घाबरले आहेत तर काही काळजीत आहेत. मी सांगत आहे की घाबरण्याची गरज नाही. धैर्य बाळगा," असेही ओवेसी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा : Maharashtra Day Sabha : महाराष्ट्र दिनी राज, उद्धव ठाकरे अन् फडणवीसांमध्ये रंगणार जुगलबंदी, आंबेडकरांचाही शांती मार्च

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.