नवी दिल्ली: सोनिया गांधींना काँग्रेस पक्षांतर्गत सुधारणा हव्या आहेत, पण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी तो मोडून काढला आहे. जी 23 नेते त्यांना टार्गेट करून काँग्रेस पक्ष कमकुवत करत आहेत. भाजप हा काही बारमाही पक्ष असू शकत नाही आणि तो मोदींनंतरच्या राजकारणातील गोंधळ सहन करू शकणार नाही असेही मोईली यांनी म्हणले आहे.
पाच राज्यातील पराभवा नंतर काॅंग्रेस प्रचंड अस्वस्थ आहे. कार्यकारणीच्या बैठकीत सोनियांनी पुन्हा नेतृत्व करावे असे ठरवण्यात आले आहे. यातच पक्षातील असंतुष्ठांच्या जी 23 या गटाने संघटनात्मक बदलाचा सुर आळवला होता. त्यांच्या सातत्याने बैठका सुरु आहेत जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Senior leader Ghulam Nabi Azad) यांनी आजच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Party President Sonia Gandhi) यांची भेट घेउन चर्चा केली.
काॅंग्रेस मधे आव्हान देणाऱ्या जी 23 गटातील नेत्यांवरही मोईली यांनी चांगलीच टिका केली आहे. तेच नेते पक्षाचे खच्चीकरण करताना पक्ष दुर्बल करत आहेत असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.
मोईली यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये भाजपाविषयी भूमिका मांडली. यात त्यांनी म्हणले आहे की भाजप हा कायम स्वरुपी राहणारा पक्ष नाही. भाजप आणि इतर पक्ष प्रवासी आहेत. ते येतील आणि जातीलही मात्र काॅंग्रेस इथेच राहणार आहे. नरेंद्र मोदी नंतर जी परस्थिती निर्माण होईल त्यात भाजप टिकू शकणार नाही.
-
Sonia Gandhi wants reforms within the Congress party but people around her have sabotaged it. G23 leaders are targeting the senior leader & weakening the Congress party. BJP cannot be a perennial party & it will not stand the turmoil of politics after Modi: M. Veerappa Moily pic.twitter.com/BTwkrOy48I
— ANI (@ANI) March 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sonia Gandhi wants reforms within the Congress party but people around her have sabotaged it. G23 leaders are targeting the senior leader & weakening the Congress party. BJP cannot be a perennial party & it will not stand the turmoil of politics after Modi: M. Veerappa Moily pic.twitter.com/BTwkrOy48I
— ANI (@ANI) March 18, 2022Sonia Gandhi wants reforms within the Congress party but people around her have sabotaged it. G23 leaders are targeting the senior leader & weakening the Congress party. BJP cannot be a perennial party & it will not stand the turmoil of politics after Modi: M. Veerappa Moily pic.twitter.com/BTwkrOy48I
— ANI (@ANI) March 18, 2022
हेही वाचा : 23 LEADERS MEET : सोनिया गांधी यांची भेट चांगली झाली त्याच अध्यक्ष राहतील हे एकमताने ठरले