ETV Bharat / bharat

BJP Win UP 2022 : उत्तरप्रदेशात पुन्हा 'योगी बा'; बसपा, काँगेसचा सुपडा साफ - उत्तरप्रदेश निकाल भाजप विजयी

उत्तरप्रदेश निवडणुकीचे निकाल (UP Assembly Election Result 2022) जाहीर झाले आहेत. भाजपने उत्तरप्रदेशात (BJP Win UP Election 2022) जवळपास 270 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्तेसाठीची 202 ही मॅजिक फिगर भाजपने गाठली आहे.

cm yogi adityanath
योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Mar 10, 2022, 7:35 PM IST

लखनौ - देशाचे लक्ष लागलेल्या उत्तरप्रदेश निवडणुकीचे निकाल (UP Assembly Election Result 2022) जाहीर झाले आहेत. भाजपने उत्तरप्रदेशात (BJP Win UP Election 2022) जवळपास 270 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्तेसाठीची 202 ही मॅजिक फिगर भाजपने गाठली आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात पुन्हा योगीराज आले आहे. योगींच्या मॅजिकपुढे विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. काँग्रेस आणि बसपाचा सुपडासाफ झाला आहे. या दोन्ही पक्षांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने तोकडी फाईट दिली, पण भाजपला सत्तास्थापणेपासून राखू शकले नाहीत.

  • योगी आदित्यनाथ यांनी इतिहास रचला -

उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखली आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी इतिहास रचला आहे. कारण याआधी भाजपचा एकही मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवू शकलेला नाही. आतापर्यंत उत्तरप्रदेशात कल्याण सिंह, रामप्रकाश गुप्ता, राजनाथ सिंह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले असून, यापैकी कोणालाही दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी नवा विक्रम रचला आहे.

  • भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष -

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पक्षाच्या दणदणीत विजयाने उत्साहात असलेले कार्यकर्ते होळीपूर्वीच रंग आणि गुलालाची होळी खेळत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील भाजप कार्यालयाबाहेर आणि आजूबाजूला कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये भाजपने (BJP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली होती. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली होती. दुसरीकडे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीदेखील जोरदार प्रचार केला होता.

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. बहुमतासाठी 202 जागांची गरज आहे. आकडेवारीनुसार भाजपने मॅजिक फिगर गाठली आहे. सध्या भाजपने जवळपास 270 हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. तर समाजवादी पक्षाने शतकी खेळी केली आहे. तर बसपा, काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

  • उत्तरप्रदेशात सेना, राष्ट्रवादी फ्लॉप-

शिवसेनेने उत्तरप्रदेश आणि गोव्यात उमेदवार उभे केले होते. मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज मंत्र्यांची फळी उत्तरप्रदेशात प्रचारासाठी गेली होती. सध्याच्या कलानुसार उत्तरप्रदेशात शिवसेनेचा शो फ्लॉप होताना दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही उत्तरप्रदेशात एक उमेदवार उभा केला होता. तोदेखील पराभूत होण्याच्या मार्गावर आहे.

  • काँग्रेसची स्थिती बिकट -

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेसने प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढवली होती. काँग्रेसने सर्व 403 जागांवर आपले उमेदवार दिले होते. प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी 'लड़की हूं,लड़ सकती हूं' या घोषणासह महिलांना 40 टक्के जागा दिल्या होत्या. पण काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला 403 जागांपैकी फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

2007 मध्ये एकहाती सत्ता मिळवणारा बसपा आता यूपीत फक्त एका जागेपुरताच राहिला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला 19 जागांवर यश मिळाले होते. मात्र, अनेक आमदारांनी बसपाची साथ सोडत भाजप आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे याचा फटका बसपाला बसला असून, 2017 चा आकडेदेखील बसपाला आता गाठता आला नाही.

  • उत्तरप्रदेशमधील 2017 ची परिस्थिती

२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने 325 जागांवर घवघवीत यश प्राप्त करत सत्ता स्थापन केली होती. भाजपाला निवडणुकीत एकूण ३९.६७ टक्के मते मिळाली होती. तर समाजवादी पक्षाने ४७ आणि बहुजन समाज पक्षाने १९ जागांवर विजय प्राप्त केला होता. काँग्रेसला केवळ सात जागाच प्राप्त झाल्या होत्या.

403 पैकी 325 जागा मिळवून भाजपने मित्र पत्राबरोबर गेल्या निवडणुकीत एक मजबूत सरकार दिले होते. एकट्या भाजपनेच 312 जागा खिशात घातल्या होत्या. त्या वेळी उत्तर प्रदेशात मोदींची लाट होती, असे म्हटले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.