ETV Bharat / bharat

National Mathematics Day 2022 :आज राष्ट्रीय गणित दिवस ; जाणून घ्या, थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दलची माहिती - राष्ट्रीय गणित दिवस

राष्ट्रीय गणित दिन ( National Mathematics Day ) साजरा करण्यामागे लोकांमध्ये जनजागृती करणे हा उद्देश आहे. देशाच्या तरुण पिढीमध्ये गणिताचे शिक्षण घेण्यासंबंधी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यासाठी अनेक पुढाकार घेतले जातात, या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. या दिवशी गणित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिबिरांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. तरुणांमध्ये गणिताबद्दल प्रोत्साहन, जनजागृती आणि सकारात्मक निर्माण करणे हा उद्देश आहे. श्रीनिवास रामानुजन ( Birthday of Mathematician Srinivasa Ramanujan ) यांच्याबद्दलची माहिती जाणून घ्या.

National Mathematics Day 2022
राष्ट्रीय गणित दिवस
author img

By

Published : Dec 22, 2022, 9:20 AM IST

नवी दिल्ली : थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांची जयंती 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा केला ( Birthday of Mathematician Srinivasa Ramanujan ) जातो. राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला (National Mathematics Day 2022) होता. त्यांनी गणित विश्लेषण, अनंत श्रेणी, घातांक यामध्ये अमूल्य असे योगदान दिले.

कार्यक्रम आयोजित : राष्ट्रीय गणित दिन भारतातील विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा केला जातो. इतकेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय संस्था युनेस्को आणि भारत यांनी गणित शिकण्यासाठी व समजून घेण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे. याखेरीज विद्यार्थ्यांना गणिताचे शिक्षण देण्यासाठी आणि जगभरातील विद्यार्थी व अभ्यासकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी विविध पावले उचलली गेली आहेत. भारतातील सर्व राज्ये राष्ट्रीय गणित दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. आज शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विविध स्पर्धा आणि गणिताचे प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी, संपूर्ण भारतभरातील विद्यार्थी या कार्यक्रमांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये भाग (Mathematician Srinivasa Ramanujan) घेतात.

गणितामधील योगदान : रामानुजन यांची गणितामधील प्रतिभा ही १८ व्या शतकातील यूलर आणि १९ व्या शतकामधील जॅकोबीप्रमाणे मानली जाते. त्यांनी रीमॅन सीरीज, इलिप्टिक इंटीग्रिल, हायपरजोमॅट्रिक सीरीज आणि जीटा फंक्शनमध्ये काम केले. त्यांच्या मृत्यूनंतर तीन वह्या आणि अनेक पानांवर गणिततज्ज्ञांनी काम केले. २०१५ मध्ये रामानुजन यांच्यावर 'द मॅन हू न्यू इन्फिनिटी' हा बायोपिक बनविण्यात आला. त्यामध्ये देव पटेल यांना रामानुजन यांनी भूमिका केली. मॅथ्यु ब्राऊन यांनी सिनेमाचे दिग्दर्शन (Why celebrated national mathematics day) केले.

रोचक तथ्य : रामानुजन १३ वर्षांचे असताना त्यांनी मदतीशिवाय त्रिकोणमितीचा सराव केला होता. शाळेत रामानुजन यांचे कोणीही मित्र नव्हते. कारण त्यांचे साथीदार त्यांना शाळेत क्वचितच समजत असत आणि गणिताच्या कौशल्यामुळे नेहमीच भयभीत राहत होते. जरी त्यांनी नेहमी गणितामध्ये अपवादात्मक कामगिरी केली असली, तरी तारुण्यात ते पदवी मिळवू शकले नाहीत. कागद महाग होता, म्हणून ते रामानुजन अनेकदा पाटी वापरायचे. केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून निवडले गेलेले ते पहिले भारतीय होते. १९०९ मध्ये जेव्हा रामानुजन यांचे लग्न झाले, तेव्हा ते १२ वर्षांचे होते आणि त्यांची पत्नी जानकी अवघ्या दहा वर्षांची होती. रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळवणारे श्रीनिवास रामानुजन हे एकमेव भारतीय (Srinivasa Ramanujan) होते.

रामानुजन यांचे कार्य : १४ वर्षे वय असताना रामानुजन हे घरातून पळून गेले. त्यांनी मद्रामधील पचैयप्पा कॉलेजमध्ये प्रवेश ( National Mathematics Day ) घेतला. त्यांना केवळ गणितामध्ये चांगले गुण मिळत होते. त्यामुळे त्यांना कला शाखेची पदवी मिळू शकली नाही. आर्थिक परिस्थिती गरीब असतानाही त्यांचे गणितामध्ये संशोधन सुरू होते. १९१२ मध्ये इंडियन मॅथिटिकल सोसायटीचे संस्थापक रामास्वामी अय्यर यांनी मदत केली. त्यामुळे रामानुजन यांना मद्रास पोर्टमध्ये क्लार्कची नोकरी मिळू शकली. रामानुजन यांनी ब्रिटिश गणितज्ज्ञांना आपले संशोधन पाठविणे सुरू ठेवले. त्यांना १९१३ मध्ये यश मिळाले. केंब्रीज विद्यापीठातील जी. एच. हार्डी यांनी त्यांना लंडनमध्ये शिकण्यासाठी बोलावून घेतले. १९१४ मध्ये रामानुजन ब्रिटनमध्ये पोहोचले. हार्डी यांनी त्यांना ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश दिला. १९१७ मध्ये रामानुजन यांची लंडनमधील मॅथमॅटिकल सोसायटीच्या सदस्यपदी निवड झाली. १९१८ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो झाले. असे यश मिळणारे रामानुजन हे सर्वात कमी वयाचे व्यक्ती ठरले. इंग्लंडमधील यशानंतर रामानुजन हे १९१९ मध्ये भारतात परतले. रामानुजन यांची प्रकृती बिघडली. १९२० मध्ये केवळ वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांचे निधन (National Mathematics Day 2022) झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.