कटिहार (बिहार) - बिहारमधील कटिहार जिल्ह्यात एका मुलाच्या जन्माची चर्चा ही संपूर्ण भारतातील विषय झाला आहे. येथील रुग्णालयात ( Katihar Sadar Hospital ) मुफस्सिल ठाणे परिसरातील राहणाऱ्या महिलेला चार हात आणि चार पाय असलेल्या मुलाला जन्म ( Birth of a child with four hands four legs in bihar ) दिला आहे. या अद्भूत बालकाला पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी लोकांनी मुलाचे फोटो काढण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत.
वैद्यकीय शास्त्रात अनेक अशा घटना -
हफलागंजमधील महिला प्रसूती वेदनांनंतर कटिहार सदर रुग्णालयात पोहोचली होती, जिथे तिने एका अद्भूत मुलाला जन्म दिला. दुसरीकडे सदर हॉस्पिटलचे डॉक्टर शशी किरण सांगतात की यात अद्भूत, आश्चर्य किंवा देवी करिश्मा असे काहीही नाही. असे वैद्यकीय शास्त्रात यापूर्वी अनेकदा घडले आहे.
हेही वाचा - Boat Drowned in Bihar : चंपारण येथे नदीत नाव पलटली; 24 जण बुडाले, 'इतके' सापडले मृतदेहचार हात पाय असलेले बाळ जन्मले;