चिंतपूर्णी/ऊना - माता चिंतपूर्णीच्या परिसरात आई छिन्नमस्तिका जयंती ही कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी देवीच्या मंदिरला नववधूप्रमाणे सजवले होते. रंग-बिरंगी फुले ही परिसराची शोभा वाढवत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात प्रवेश नाही. मात्र मंदिरातील पूजा ही नेहमीप्रमाणेच साध्या पद्धतीने करण्यात आली.
यज्ञ करून आई छिन्नमस्तिका जयंती केली साजरी -
मंदिरात पुजारी सभेच्यावतीने जयंतीच्यानिमित्ताने विधिवत पूजा-अर्चना आणि यज्ञ करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू यांनी देखील भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
देश-विदेशातील भाविकांना दिल्या शुभेच्छा -
मंदिर पुजारी सभेचे अध्यक्ष रविंद्र छिंदा यांनी देश-विदेश येथील सर्व भाविकांना आई छिन्नमस्तिका जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. वैश्विक कोरोना महामारीपासून सर्व मानव जाती सुरक्षित होवो असे साकडे घातले.
पोलीस महासंचालक संजय कुंडू पायरीवर नतमस्तक -
हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू यांनी देखील मंदिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते कोरोना नियमाचे पालन करत आई छिन्नमस्तिकेच्या मंदिर परिसरातील पायरीवर नतमस्तक झाले.
हेही वाचा - देवा, आता तूच वाचव! कोरोनामुक्तीसाठी दंडवत घालत देवांना आजोबांचे साकडे