ETV Bharat / bharat

बिल्किस बानो प्रकरण ; आरोपींच्या सुटकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालय करणार 'फैसला'

Bilkis Bano case : बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना गुजरात सरकारनं शिक्षेतून सूट दिली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय सोमवारी 'फैसला' सुनावणार आहे.

Bilkis Bano case
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 7:02 AM IST

नवी दिल्ली Bilkis Bano case : गुजरात दंगलीनं देशभरात खळबळ उडवून दिली होती. गुजरात दंगलीत पीडित असलेल्या बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील 11 आरोपींना मुदतपूर्व शिक्षेतून सुटका देण्यात आली होती. मात्र या सुटकेविरोधात पीडितेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय सोमवारी निकाल देणार आहे.

गुजरात सरकारनं केली होती सुटका : गुजरात दंगलीतील दोषींनी 15 वर्ष शिक्षाभोगली होती. त्यानंतर गुजरात सरकारनं त्यांच्या शिक्षा धोरणानंतर या 11 आरोपींना शिक्षेत सूट देत त्यांची सुटका करण्यात आली होती. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यायमूर्ती बी व्ही नवरथना आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठानं या खटल्यातील दोषींच्या माफीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवला होता. तेव्हा खंडपीठानं "आम्ही याचिकाकर्त्यांचे युक्तीवाद आम्ही ऐकले आहेत. सादर केलेले मूळ रेकॉर्ड गुजराती भाषेत आहेत. त्यामुळं मूळ रेकॉर्ड सादर करण्यात यावेत. त्यासाठी हा निकाल राखून ठेवण्यात येत आहे" असं खंडपीठानं नमूद केलं होतं.

गुजरात दंगलीतील आरोपींच्या सुटकेला आव्हान : गुजरात सरकारनं गुजरातमध्ये झालेल्या दंगलीतील आरोपींची आपल्या शिक्षा धोरणांनुसार सुटका केली होती. बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका केल्यानं गुजरात सरकारवर प्रचंड टीका करण्यात आली होती. आरोपींची सुटका झाल्यानं बिल्किस बानो यांनी या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. याप्रकरणी याचिका दाखल करणाऱ्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी युक्तीवाद करताना " माफी करताना सुधारणा आणि प्रतिबंधात्मक तत्वे लक्षात ठेवली पाहिजे" असं स्पष्ट केलं. तर वृंदा ग्रोव्हर दोषींनी त्यांची शिक्षा भोगताना चूक केल्याबद्दल आकारला जाणारा दंड भरला नसल्याचं निदर्शनात आणून दिलं. मात्र यावर खंडपीठानं " हे दोन टोकाचं प्रकरण आहे. त्यावर समतोल कसा साधायचा, याचा विचार केला पाहिजे. गुन्ह्याचे स्वरुप आणि सुधारणेचा अधिकार कसा संतुलित करायचा ? या आरोपींना सुधारणेचा अधिकार नाही का ? " असा सवालही खंडपीठानं यावेळी केला.

हेही वाचा :

  1. Bilkis Bano Case : आरोपी माफीला पात्र कसे? बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायलयाचा सवाल, 20 सप्टेंबरला पुढील सुनावणी
  2. Judge Salve on Bilkis Bano Case बिल्किस बानो केसमधील ११ आरोपींच्या निर्दोष मुक्तततेवर, शिक्षा ठोठावणारे माजी न्यायधीश साळवे यांचा आक्षेप
  3. Bilkis Bano Case सुटका झालेल्या दोषींना पुन्हा तुरुंगात पाठवावे, बिल्किस बानोच्या पतीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.