पाटणा : प्रेमाच्या त्रिकोणातून बिहारच्या तरुणाचा तेलंगाणात खून करुन मृतदेह पुरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना थेम्मापूर येथे 18 जुलैला घडली आहे. राज कपिल असे खून करण्यात आलेल्या बिहारच्या तरुणाचे नाव असून तो बिहारमधील बक्सरच्या उत्तरटोला येथील राहणारा होता. तर राहुल कुमार सिंग उर्फ अमरनाथ, मोहम्मद ताहीर यांच्यासह त्यांच्या दोन साथिदारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अमरनाथ आणि कपिल हे दोघेही एकाच मुलीवर प्रेम करत असल्याने हा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वडिलांच्या निधनानंतर आम्ही भावांनी मिळून घर चालवले. याच क्रमात कपिललाही कमाईसाठी बाहेर पाठवण्यात आले होते. हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे, यावर विश्वास बसत नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. - सूरज, कपिलचा भाऊ
कंपनीत कामाला गेला आणि परतलाच नाही : बिहारचा राज कपिल हा बक्सरच्या उत्तर टोला येथील असून तो थेम्मापूर येथील एका कंपनीत कामाला होता. 18 जुलैला राज कपिल हा आपल्या राहत्या घरातून ड्युटीवर गेला होता, मात्र तो परत आला नाही. त्यामुळे त्याचा शोध सुरू करण्यात आला. त्यानंतर थोमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
18 जुलै रोजी राज कपिल कामावरून घरी परतला. दुपारी 3.30 वाजता मोबाईल फोन चार्ज करून तो घराबाहेर पडला मात्र परत आलाच नाहीत. आजूबाजूच्या नागरिकांनी कपिल हा त्याचा शेजारी राहणाऱ्या राहुल सिंगसोबत शेवटचा दिसला होता. पोलिसांनी राहुल सिंगसह चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. - नारायण रेड्डी, पोलीस उपायुक्त
कपिलसोबत अमरनाथ शेवटी दिसल्याचे उघड : राज कपिल हा 18 जुलैला ड्युटी करून आपल्या निवासस्थानी परतला होता. दुपारी 3 वाजताच्या सुमारास मोबाईल चार्ज करून तो राहत्या घरातून बाहेर पडला त्यानंतर परत आलाच नाही. या प्रकरणी राज कपिलसोबत राहणाऱ्या त्याच्या साथीदारांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली तेव्हा, त्याच्यासोबत शेजारी राहणारा राहुल सिंग उर्फ अमरनाथ शेवटी दिसल्याचे उघड झाले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमरनाथसह चार तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नारायण रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लव्ह ट्रँगलमुळे खून : अमरनाथ ज्या मुलीवर प्रेम करत होता त्याच मुलीवर राज कपिलचे प्रेम होते. त्यामुळे अमरनाथने आपल्या तीन साथीदारांसह राज कपिलच्या पोटात चाकूचे वार करुन दगडाने त्याचे डोके ठेचल्याची कबुली या आरोपींनी दिली. राज कपिल मृत झाल्यानंतर त्याचा मृतदेह निर्जन ठिकाणी नेऊन मातीत पुरला. चारही आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी राहुल कुमार सिंग उर्फ अमरनाथ, मोहम्मद ताहीर आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.
कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर : राज कपिलया खून केल्यामुळे त्याच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे. कपिल हा चार भावांमध्ये सर्वात लहान होता. वडिलांच्या निधनानंतर भावांनी घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या क्रमात कपिलही कमाईसाठी बाहेर पडला. कपिलचा भाऊ सूरजने हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे, यावर विश्वास बसत नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सूरजने केली आहे. कपिलचा मृतदेह शुक्रवारी त्याच्या गावी पोहोचल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
हेही वाचा -