पटना - बिहार सरकारने तृतीयपंथीयांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बिहार पोलिसांत तृतीयपंथीयांची भरती केली जाणार ( Recruitment Of Transgender In Police ) आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभागाने तृतीयपंथीयांचा समावेश अनुसूचित जाती वर्गात केला आहे.
बिहारमध्ये आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीत प्रत्येकी 500 पदांमध्ये एका तृतीयपंथीयाला संधी दिली जाणार आहे. त्यानुसार शिपाई पदासाठी 41 तर पोलीस उपनिरीक्षकासाठी 10 तृतीयपंथीयाला नियुक्त केले जाईल. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बिहार सरकारने केलेल्या या प्रयत्नांचे तृतीयपंथीयांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, जर पोलीस भरतीसाठी पात्र तृतीयपंथी उमेदवार आढळले नाही. तर मागासवर्गीय समुदायातील उमेदवार त्या जागी नियुक्त केले जातील. सरकारी नोकऱ्यांत तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याच्या मुद्यावर मुख्य सचिव अमीर सुभानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला गृह आणि सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - Pune Crime News : शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न