ETV Bharat / bharat

Bihar Bridge Collapse: गंगा नदीवर पूल पडला की पाडला? तेजस्वी यादव यांच्या वक्तव्याने संभ्रम

बिहारमध्ये सुलतानगंज-अगुवानी घाटादरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल नदीत कोसळल्यानंतर बिहार सरकार आणि रस्ते बांधकाम विभागावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. यासोबतच बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचेही यावरून दिसून येते. विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असतानाच सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Bihar Bridge Collapse
बिहार पूल दुर्घटना
author img

By

Published : Jun 5, 2023, 12:06 PM IST

पाटणा : बिहारमध्ये पुलाचे काम सुरू असतानाच पूल कोसळल्याने घटनेने बिहार सरकारवर देशभरात टीका होत आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे करण्याचे उपमुख्यमंत्री व रस्ते बांधकाम मंत्री तेजस्वी यादव यांनी आदेश दिले आहेत. यासोबत त्यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे. बिहार सरकारने विभागीय अधिकाऱ्यांसह अभियंते आणि बांधकाम कंपनीशी संबंधित लोकांनाही बैठीकासाठी पाचारण केले आहे.

पूल कोसळल्यानंतर रविवारी सायंकाळी बिहारचे बांधकाम मंत्री तेजस्वी यादव यांनी रस्ते बांधकाम विभागाचे अपर सचिव प्रत्यय अमृत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तेजस्वी यादव म्हणाले, की हा तोच पूल आहे, जो यापूर्वी कोसळला होता. त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो. त्याबाबत आम्ही सरकारला जाब विचारला होता. आमचे सरकार स्थापन झाले तेव्हा आयआयटी रुरकीकडून पूल कोसळल्याची चौकशी करण्यात आली. पुलाचा खांब क्रमांक 5 कोसळल्याचे सांगण्यात आले. कमकुवत पाया असल्याने पूल पाडण्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याची चौकशी होईल. पण तुम्ही समजून घ्या की पूल पाडण्याची जबाबदारी संबंधितावर देण्यात आली आहे. त्यात कोणतेही नुकसान नाही.

भाजपकडून नितीश कुमार व यादव यांच्या राजीनाम्याची मागणी : पूल कोसळण्याच्या घटनेवरून बिहारमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा म्हणाले की, हे बिहार सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे. पूल कोसळण्याची दुर्घटना सर्व भ्रष्टाचार आणि कमिशनमुळे होत आहे. या पुलाच्या निकृष्ट बांधकामाबाबत आमदारांनी सभागृहात सातत्याने प्रश्न उपस्थित केला. यापूर्वीही हा पूल भागलपूर बाजूने तोडण्यात आला. आता खगरिया बाजूने पूल पाडण्यात आला आहे. नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.

  • पुल नहीं बिहार की जनता का विश्वास गिर गया है।
    दो-दो बार निर्माणाधीन पुल का भर-भराकर गिर जाना प्रमाणित करता है कि भ्रष्टाचार हुआ है ।
    आंधी से गिरने पर इसी पुल को लेकर पूरे देश में बिहार की बदनामी भी हुई थी और आपने जांच का भरोसा भी दिया था लेकिन वो जांच रिपोर्ट अब तक नहीं आई ।… pic.twitter.com/dtFRNaUCCb

    — Vijay Kumar Sinha (@VijayKrSinhaBih) June 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संपूर्ण राज्यात भ्रष्टाचार बोकाळल्याने अधिकारी खुलेआम कमिशन घेत आहे. अशा घटना घडणे ही काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. याआधीही पूल कोसळला होता. पण कारवाई झाली नाही. विजय कुमार सिन्हा, विरोधी पक्षनेते, बिहार विधानसभा

गंगा नदीवर बांधण्यात आला पूल : रविवारी सुलतानगंज-अगुवानी घाटादरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल अचानक कोसळला. 30 हून अधिक स्लॅब म्हणजेच 100 फूट लांबीचा पूल नदीत कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी काम बंद असल्याने मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र, एक सुरक्षारक्षक अद्यापही बेपत्ता आहे.

2022 मध्येही पूल कोसळला होता: याच ठिकाणी 30 एप्रिल 2022 रोजी नदीत पूल कोसळला होता. जेव्हा भाजपचे सरकार होते. नितीन कुमार यांच्याकडे बांधकाम मंत्रालय होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2014 मध्ये या पुलाची पायाभरणी केली होती. त्यासाठी सुमारे 1700 कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. हा पूल एसपी सिंगला कंपनीकडून पूल खगरिया जिल्ह्यात बांधण्यात येत आहे.

हेही वाचा-

  1. Bridge Collapsed : गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला; पाहा भयावह व्हिडिओ
etv play button

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.