मुझफ्फरपूर (बिहार) : बिहारमधील मुझफ्फरपूरमधून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथे 6 जणांनी मिळून एका निष्पाप मुलीवर तब्बल 28 दिवस बलात्कार केला. त्यामुळे या मुलीची प्रकृती बिघडली. यानंतर आरोपींने तिच्या आईला फोन करून, 'तुमच्या मुलीला घेऊन जा' असे सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
28 दिवस गँगरेप केला : पीडितेच्या आईने सांगितले की, सरैया पोलिस स्टेशनच्या हद्दीदील सिसवानिया गावातील काही लोकांनी 9 जुलै रोजी तिच्या 13 वर्षांच्या मुलीचे अपहरण केले होते. नराधमांनी कारमधून येऊन मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेच्या 28 दिवसांनंतर 5 ऑगस्ट रोजी महिलेला फोन आला. 'तुमच्या मुलीला सरैया येथील चौकातून घेऊन जा', असे चोरट्यांनी फोनवर सांगितले. रात्री 8 वाजता आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी पोहचल्यावर तेथे ही मुलगी पडून होती. तिची प्रकृती बिघडली होती. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तरुणीचा आरोपींशी सोशल मीडियावरून संपर्क : या घटनेनंतर मुलीच्या आईने आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. आता पोलीस आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा या आरोपींशी सोशल मीडियावरून संपर्क होता.
आम्ही या प्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यासोबतच पीडितेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. तिने आरोपींची ओळख सांगितली आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिस छापे टाकत आहेत. - विजय कुमार सिंग, तपास अधिकारी
अपहरणाच्या तक्रारीवर कारवाई नाही : या मुलीच्या अपहरणप्रकरणी 9 जुलै रोजी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. पोलिसांनी कारवाई केली असती तर माझ्या मुलीसोबत अशी घटना घडली नसती. बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा :