पाटणा : अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे पतीने पत्नीला हार्मोनल बदलाचे इंजेक्शन दिल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना बिहारच्या भोजपूरमधील ब्रह्मपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पतीने हार्मोनल बदलाचे इंजेक्शन दिल्यामुळे महिलेच्या शरीरात अनेक बदल घडून आले आहेत. महिलेचे सगळे केस गळून गेले असून हाडांची रचना 90 वर्षाच्या महिलेसारखी झाली आहे. ही महिला आज जिवंत असूनही मृत्यूपेक्षाही वाईट जीवन जगत आहे. याप्रकरणी उदवंतनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उदवंतनगर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बक्सर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार महिलेच्या मुलाची तिच्या सासरच्या घरातून सुटका करून पीडितेच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे. - बैजनाथ चौधरी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, ब्रह्मपूर
नवऱ्याचे अनैतिक संबंध : भोजपूर जिल्ह्यातील उदवंतनगर पोलीस ठाण्याच्या एका गावातील पीडित महिलेचा विवाह 2018 मध्ये झाला होता. तिच्या नवऱ्याचे तिच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप या पीडितेने केला. या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यामुळे तो पीडितेला मारहाण करत असल्याचा आरोप पीडितेने केला. त्यामुळे पीडिता नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी गेली. यानंतर पतीने तडजोड करून तिला पुन्हा सासरी नेले होते.
आठ महिन्यांपासून पीडिता बेपत्ता : पतीने तडजोड करुन सासरी नेल्यानंतर पत्नीला पाटण्यातील बिहटा येथे सासरच्यांपासून वेगळे ठेवण्यास सुरुवात केली. जवळपास आठ महिन्यांपासून आपल्या बहिणीबद्दल कोणतीही माहिती मिळत नसल्याचा दावा पीडितेच्या भावाने केला. खूप शोध घेऊनही सासरच्यांनी काहीही न सांगितल्यावर आई-वडिलांनी उदावंतनगर पोलीस ठाण्यात बहिणीच्या खुनाची तक्रार दाखल केली. तेव्हाच सासरच्यांनी पीडितेला घरात लपवून ठेवल्याचे उघड झाले.
बहिणीची अवस्था पाहून बसला धक्का : पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर बहीण जिवंत असल्याचे समजले. मात्र सासरच्यांनी तिला ठेवलेल्या ठिकाणी आम्ही गेला, तेव्हा बहिणीची अवस्था पाहून आम्हाला धक्काच बसल्याचे पीडितेच्या भावाने सांगितले. माझी 25 वर्षाची बहीण प्रचंड बदलली होती. तिच्या अंगात ताकद उरली नव्हती. तिला साखळीने बांधून ठेवण्यात आले होते. पीडितेची अवस्था आम्ही डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. तिच्या चेहऱ्यावर केसही वाढले होते. कशीबशी आम्ही तिची तिथून सुटका केली. दुसरीकडे आई वडील आल्याची माहिती मिळताच तिचा पती फरार झाल्याचेही पीडितेच्या भावाने यावेळी सांगितले.
पती देत होता हार्मोन बदलण्याचे इंजेक्शन : बहिणीला मुक्त केल्यानंतर तिला उपचारासाठी पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे तिच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर तिला घरी नेण्यात आले. पीडिता पतीच्या त्रासामुळे मानसिक आजारी झाली होती. तिचा पती तिला हार्मोन बदलण्याचे इंजेक्शन देत असल्याचा आरोप पीडितेच्या भावाने केला. त्यामुळे पीडितेची अवस्था अशी झाल्याचेही पीडितेच्या भावाने यावेळी स्पष्ट केले. पोलिसांनी पीडितेला तिच्या सासरच्या घरातून सोडवून माहेरी आणले आहे. या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी उदवंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -