ETV Bharat / bharat

Big Train Accident Averted : रेल्वेचा मोठा अपघात टळला; एकाच रुळावरुन धावली मेमू आणि मालगाडी - प्रवाशांचे जीव

एकाच रुळावर मेमू आणि मालगाडी समोरासमोर आल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना रायपूर बिलासपूर दरम्यान घडल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

Big Train Accident Averted
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 11, 2023, 10:23 PM IST

एकाच रुळावरुन धावली मेमू आणि मालगाडी

रायपूर : बालासोर येथे घडलेल्या रेल्वेच्या अपघातात तब्बल 288 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच प्रकारचा अपघात टळल्याचे पुढे आले आहे. एकाच रुळावरुन मेमू आणि मालगाडी धावल्याची घटना रायपूर, बिलासपूर ते कोरबा जाणारी मेमू रुळावर थांबल्यानंतर त्याच रुळावर 100 मिटर अंतरावर मालगाडी थांबलेली दिसल्याने प्रवाशांच्या पायाखालची वाळूच सरकली. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे या प्रवाशांचे जीव वाचल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने आपले स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एकाच ट्रॅकवर दोन्ही रेल्वे समोरासमोर आल्याने खळबळ : रायपूर ते कोरबा जाणारी मेमू ट्रेन मधल्या रुळावर थांबवण्यात आली होती. तर पॅसेंजर ट्रेन थांबवल्यानंतर त्याच ट्रॅकवर 100 किमी अंतरावर एक मालगाडी उभी असल्याचे दिसले. एकाच ट्रॅकवर दोन्ही रेल्वे समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले, अशी चर्चा प्रवाशामध्ये सुरू होती. प्रवासी स्वतःला भाग्यवान समजत होते. त्याचवेळी रेल्वे प्रशासनाने या प्रकरणी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

रेल्वे प्रशासनाने दिले स्पष्टीकरण : एकाच रुळावरुन दोन रेल्वे गाड्या समोरासमोर आल्याचा व्हिडिओ पुढे आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांनी याप्रकरणी आपले स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ जयरामनगर-बिलासपूर विभागातील असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जयरामनगर-बिलासपूर विभाग हा स्वयंचलित सिग्नलिंग ब्लॉक विभाग असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. स्वयंचलित सिग्नलिंग ब्लॉक विभागात एकाच मार्गावर अनेक रेल्वेचे सुरक्षित ऑपहरेशन केले जाते, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एकाच मार्गावर धोकादायक ऑपरेशन : रेल्वेच्या सामान्य नियमानुसार जिथे जिथे स्वयंचलित सिग्नलिंग ब्लॉक विभाग आहे. तेथे एकाच वेळी सिग्नलच्या आधारे एकाच मार्गावर एकापेक्षा जास्त ट्रेनचे सुरक्षित ऑपरेशन केले जाते. या गाड्यांचे संचालनही याच नियमानुसार करण्यात आले आहे. रेल्वेच्या विविध विभागातील स्वयंचलित सिग्नलिंग ब्लॉक विभागात या नियमानुसार गाड्या चालवल्या जातात.

रेल्वेचा मोठा निष्काळजीपणा : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या जखमा अजून भरल्या नसून पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली असती. या घटनेत लोको पायलटच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. या प्रकरणी रेल्वेकडून स्पष्टीकरण दिले जात असले तरी स्वयंचलित सिग्नलिंगमध्ये एकाच मार्गावर अनेक गाड्या चालवता येतात. पण बालासोरसारखी घटना घडली असती तर, मग याला जबाबदार कोण असेल ? असा सवालही रेल्वे प्रवाशी विचारत आहेत.

हेही वाचा -

  1. Odisha Train Accident : 51 तासानंतर बालासोर अपघातस्थळावरून रेल्वे रवाना, बेवारस मृतदेहाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांना कोसळले रडू
  2. Indian Railway Recruitment: ओडिसा रेल्वे अपघातानंतर भारतीय रेल्वेमधील रिक्त पदांचा मुद्दा चर्चेत; ३ लाखांपेक्षा जास्त पदांची नियुक्ती बाकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.