ETV Bharat / bharat

ATS Gujarat: भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई! पाकिस्तानी बोट अडवली; 40 किलो अमली पदार्थ जप्त - गुजरात एटीएस गुप्तचर विभाग

गुजरात एटीएसच्या गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईबाबत माहिती देताना भारतीय तटरक्षक दलाने (ICG) सांगितले की, ATS गुजरातने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे अरबी समुद्रातील भारतीय क्षेत्रीय पाण्यात एक पाकिस्तानी बोट अडवण्यात आली आहे. (ATS Gujarat) या बोटीमध्ये 300 कोटी रुपयांची शस्त्रे, दारूगोळा आणि 40 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई
author img

By

Published : Dec 26, 2022, 7:24 PM IST

अहमदाबाद (गुजराच) - गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारे 25-26 डिसेंबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आल्याचे फोर्स अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आपल्या रणनीतीच्या आधारे, भारतीय तटरक्षक दलाने त्यांचे जहाज (ICGS)अरिंजय पाकिस्तानबरोबर आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ (IMBL) तैनात केले होते. पकडण्यात आलेल्या या पाकिस्तानी मासेमारी नौकेला चौकशी केली आहे. ( Pakistani boat intercepted) बोटीची झडती घेतली असता त्यामधून मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा आणि सुमारे 40 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या औषधाची किंमत अंदाजे 300 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, यामध्ये काही कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.