ETV Bharat / bharat

Herbal Gulal : होळीच्या रंगासाठी बीटरूट आणि गुलाबाच्या फुलांचा असा बनवा हर्बल गुलाल; त्वचेला होणार नाही इजा - होळी

होळीचा सण हा तरुण आणि तरुणींमध्ये नवचैतन्य संचारण्याचा सण आहे. या सणाला तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण करतात. मात्र या रंगामुळे चेहऱ्याला इजा होण्याची शक्यता असते. त्याला टाळण्यासाठी भिलाईतील महिलांची उडान नई दिशा या संस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय गुलाल बनवण्यात येत आहे.

Herbal Gulal
हर्बल गुलाल बनवणाऱ्या महिला
author img

By

Published : Mar 2, 2023, 5:13 PM IST

भिलाई : तरुणांना आकर्षित करणारा होळी हा सण आता तोंडावर आला आहे. त्यासाठी आतापासूनच बाजारपेठ रंगाने फुलली आहे. मात्र बाजारात अनेक रंग उपल्ब्ध असले, तरी या रंगामुळे चेहऱ्याला हानी पोहोचत असल्याचे अनेक उदाहरणे पुढे आले आहेत. त्यामुळे तरुण वर्ग सेंद्रीय पद्दतीने बनवलेल्या रंगाची मागणी करतात. यासाठी दुर्गच्या महिलांनी सेंद्रीय पद्धतीने गुलाल बनवला आहे. ॉ

गुलालात नाही केमीकलचा समावेश : दुर्गच्या महिलांनी यासाठी एकत्र येत उडान नई दिशा या नावाची संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या महिला सेंद्रिय पद्धतीने गुलाल बनवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या गुलालात कोणत्या प्रकारच्या केमीकलचा उपयोग करण्यात आला नसल्याची माहिती या संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. त्यासह या महिलांच्या ग्रूपमुळे इतर महिलांच्या हातालाही काम मिळाले आहे.

कसा बनवण्यात येतो सेंद्रिया पद्धतीने गुलाल : महिलांची ही संस्था भिलाईच्या सेक्टर ५ मध्ये आपल्या कार्यालयात हा सेंद्रिय पद्धतीने गुलाल बनवत आहे. यात मक्क्याच्या पावडरमध्ये बीटरूट, पालक, पलाश आणि हळदीचा समावेश असतो. याच्या एकत्रीकरणातून या महिला सेंद्रिय पद्धतीने गुलाल तयार करतात. या गुलालात कोणत्याही प्रकारच्या केमीकलचा उपयोग करण्यात येत नाही. या महिला अगदी पारंपरिक पद्धतीने या गुलालाची निर्मिती करत असल्याची माहितीही यावेळी नई उडान या संस्थेच्या महिलांनी दिली.

कसा बनवण्यात येतो सेंद्रिय गुलाल : सेंद्रिय पद्धतीने रंग बनवण्यात भिलाईतील उडान नई दिशा ही संस्था माहिर आहे. यातील महिला पारंपरिक पद्धतीने गुलाल बनवत असल्यामुळे या गुलाला बाजारात चांगलीच मागणी आहे. त्यामुळे या संस्थेच्या महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. मात्र सेंद्रिय प्दधतीने गुलाल कसा बनवण्यात येतो, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून आहे. याबाबत या संस्थेचे सदस्य शशी चंद्राकर यांनी सविस्तर माहिती दिली. या महिला घरची कामे आवरल्यानंतर उडान नई दिशा या संस्थेत येतात. यानंतर त्या बीटरूट, गुलाबजल, पालक वापरून सेंद्रिय गुलाल बनवायला सुरुवात करतात. एक किलो गुलाल बनवायला किमान १०० रुपये खर्च येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र रंगाचे लहान पॅकीट बनवून या महिला केवळ वीस रुपयाला विकत असल्याची माहिती शशी चंद्राकर यांनी दिली आहे.

हेही वाचा - Rahu Shukra Yuti 2023 : राहू शुक्राची होणार 12 मार्चपासून युती: जाणून घ्या तुमच्या राशीवर शुक्राची कसी पडेल वक्रदृष्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.