मुंबई - महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 40 आणि काही अपक्षांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे आता शिवसेना सावध झाली आहे. राष्ट्रपती निवडणूक आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेने लोकसभेतील आपला प्रतोद बदलला आहे. खासदार भावना गवळी यांनी लोकसभा शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हकालपट्टी करण्यात आली ( Bhavana Gawali Removed Loksabha Chip Whip ) आहे. यासंदर्भात शिवसेना संसदीय नेते संजय राऊत यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहलं आहे. गवळींच्या जागी खासदार राजन विचारे यांची प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजन विचारे नवे प्रतोद - 18 तारखेपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. तसंच याच दिवशी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. द्रौपदी मुर्मू या भाजप पुरस्कृत एनडीएच्या उमेदवार आहेत. तर, युपीएने यशवंत सिन्हा यांना रिंगणात उतरवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना सावध झाली आहे. भावना गवळींची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार राजन विचारे यांची लोकसभा प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली ( ShivSena Appoints Rajan Vichare As Chief Whip ) आहे.
'त्या' पत्रामुळे भावना गवळींची उचलबांगडी? - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह केलेल्या बंडखोरी केली होती. त्यामुळे भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. त्यामध्ये "आपले आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणांस एक मोठा निर्णय घेण्यासाठी विनंती करत आहेत. त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता कठीण असता तरी शिवसैनिकांसाठी निर्णय घ्यावा," अशी विनंती गवळी यांनी उद्धव ठाकरेंना केली होती. एकप्रकारे एकनाथ शिंदेच्या बाजुने कल घेण्यासाठी हे पत्र त्यांनी लिहले होते.
राहुल शेवाळेंनीही लिहलं होत पत्र - मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी ( 5 जुलै ) उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं होतं. त्यात राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या पत्राला चोवीस तास होत नाही तोच शिवसेनेचे हालचाली केल्या आहेत. त्यांना थेट आपल्या प्रतोदची उचलबांगडी केली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही बंड होण्याची शक्यता असल्याने, शिवसेनेने प्रतोद बदलला आहे का?, असा सवाल उपस्थि होत आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray : 'तुम्हाला देण्यासारखं आता माझ्याकडे काही नाही'; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन