ETV Bharat / bharat

Lata Mangeshkar : भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर.. अफवांवर विश्वास नको.. - अतिदक्षता विभाग

कोरोना आणि निमोनिया झाल्याने गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर ( Bharat Ratna Lata Mangeshkar ) या ब्रीच कँडी रुग्णालयात ( Breach Candy Hospital ) उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर ( Lata Mangeshkar Is In Stable Condition ) असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात ( Intensive care unit ) उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

लता मंगेशकर
लता मंगेशकर
author img

By

Published : Jan 21, 2022, 7:14 PM IST

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर ( Bharat Ratna Lata Mangeshkar ) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी त्यांना रुग्णालयात ( Breach Candy Hospital ) दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोना सोबतच निमोनियाची लक्षणे दिसून आली. वयोमान आणि इतर शारीरिक व्याधींमुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर ( Lata Mangeshkar Is In Stable Condition ) असून, आणखीन काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु ठेवावे लागणार ( Intensive care unit ) असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

भारतरत्न लतादीदींच्या आरोग्याबाबत अनेक अफवा पसरत आहेत. मात्र अशा अफवा कुणीही पसरवू नयेत. लता दीदींवर अतिदक्षता विभागात डॉ. प्रतीत समदानी आणि त्यांच्या टीममधील डॉक्टर्स उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळावा, यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.