ETV Bharat / bharat

BJP Protest Against Kejriwal : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात भाजप महिला मोर्चा आक्रमक, १० हजार महिलांनी केले आंदोलन - १० हजार महिलांनी केले आंदोलन

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सुमारे 10,000 कार्यकर्त्यांनी लाल किल्ल्यासमोर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले की, केजरीवाल यांची मानसिकता देशाला सर्वात मोठा धोका आहे. त्यांच्यासारख्या मानसिकतेच्या लोकांची जागा पंजाबमध्ये नसून तुरुंगात असावी.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात भाजप महिला मोर्चा आक्रमक, १० हजार महिलांनी केले आंदोलन

author img

By

Published : Feb 19, 2022, 9:23 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने लाल किल्ल्यासमोरील गौरी शंकर मंदिराजवळ निदर्शने केली. प्रदेश भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुमारे 10 हजार महिला कार्यकर्त्यांचा सहभाग होता. महिलांनी कथितपणे अरविंद केजरीवाल यांच्या देशाचे विभाजन करून वेगळे राष्ट्र निर्माण करण्याच्या मानसिकतेच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी केजरीवाल यांचा विरोध केला.

केजरीवालांचे वक्तव्य गंभीर

आंदोलनाला संबोधित करताना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि दिल्लीचे प्रभारी बैजयंत जय पांडा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आहे. केजरीवाल यांची मानसिकता देशासाठी धोकादायक आहे. केजरीवाल हे दुटप्पी मानसिकतेचे व्यक्ती असल्याचे सांगत भाजपच्या राष्ट्रीय मंत्री आणि दिल्लीच्या सहप्रभारी डॉ.अलका गुर्जर म्हणाल्या की, ते पंजाबमधील महिलांना पेन्शन देण्याचे आणि बेरोजगारांना रोजगार देण्याचे बोलतात, मात्र दिल्लीतील महिलांना मिळणारी पेन्शन बंद झाली आहे. देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांना भारतीय महिला कोणत्याही स्वरूपात स्वीकारणार नाहीत. त्यांनी दिल्लीतील महिलांना आवाहन केले की, आम आदमी पक्षाचा कोणताही नेता मत मागायला आला तर सर्वात आधी त्यांची 85 हजार रुपये पेन्शन मागावी.

केजरीवालांचा चेहरा समोर आला

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले की, आज केजरीवाल यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. हे तेच केजरीवाल आहेत ज्यांनी देशाच्या जवानांनी शौर्य दाखवत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून ठार केल्यावर पुरावे मागितले. हे तेच केजरीवाल आहेत, ज्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडवर बहिष्कार टाकून धरणे धरले होते. आणि हेच केजरीवाल शर्जील इमाम सारख्या मानसिकतेच्या लोकांना आदर देण्याचे काम करतात आणि अमानतुल्ला खान आणि ताहिर हुसेन सारख्या दंगेखोरांना आपल्या पक्षात स्थान देण्याचे काम करतात. अखेर केजरीवाल यांनी कोणत्या शाळेतून शिक्षण घेतले आहे की, देशाचे तुकडे करून वेगळे राष्ट्र बनवण्याचे आणि पहिले पंतप्रधान बनण्याचे स्वप्न ते पाहत आहेत. अशा लोकांची जागा पंजाबमध्ये नसून तुरुंगात असावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.