ETV Bharat / bharat

'डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्यानं ऑर्डर रद्द करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पाठवली नोटीस' - notice

डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्यानं ऑर्डर रद्द करणाऱ्या अमित शुक्ला नावाच्या व्यक्तीला मध्य प्रदेश पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

झोमॅटो
author img

By

Published : Aug 1, 2019, 9:00 PM IST

नवी दिल्ली - डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्यानं ऑर्डर रद्द करणाऱ्या अमित शुक्ला नावाच्या व्यक्तीला मध्य प्रदेश पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पुन्हा या प्रकारचे टि्वट करू नका, येत्या सहा महिन्यांच्या आतमध्ये असे टि्वट केल्यास तुरुंगात जावे लागेल, असे नोटीसीद्वारे बजावले आहे.

  • Amit Singh,SP Jabalpur (MP): We have issued a notice, it will be served to Amit Shukla (Twitter user who cancelled food order over deliveryman’s religion). He'll be warned, if he tweets anything which is against ideals of Constitution, action will be taken; he is on surveillance. pic.twitter.com/27gf9qeaFg

    — ANI (@ANI) August 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जबलपूर पोलीस अधीक्षक अमित सिंह यांनी अमित शुक्ला यांना नोटीस पाठवली आहे. पुन्हा संविधानाच्या विरूद्ध टि्वट केल्यास कारवाई होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्यामुळे अमित शुक्ला या व्यक्तीने झोमॅटोला आर्डर रद्द करण्यास सांगितली होती. 'माझी आर्डर एका हिंदू नसलेल्या डिलिव्हरी बॉयने दिली आहे. डिलिव्हरी बॉय बदलणे शक्य नसून मी आर्डर रद्द केल्यास पैसै परत मिळणार नसल्याचे झोमॅटो कंपनीने सांगितले. तुमच्याकडे जेवण घेऊन कोणता डिलिव्हरी बॉय येईल याची सक्ती तुम्ही करु शकत नाही. पैसै परत करू नका. मात्र माझी आर्डर रद्द करा,' असे ट्विट अमित शुक्लाने केले होते.

झोमॅटोचं कौतुकास्पद उत्तर -
यावर 'अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो', असे कौतुकास्पद उत्तर झोमॅटोनं दिले. या उत्तरामुळे झोमॅटोवर कौतुकांचा वर्षाव झाला आहे. 'आम्हाला भारताच्या मूळ संकल्पनेचा सार्थ अभिमान आहे. आमच्या ग्राहकांच्या आणि भागिदारांच्या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही व्यवसाय करताना मूल्ये पाळतो. त्यामुळे आमच्या मूल्यांच्या आड येणारा व्यवसाय गमावल्याबद्दल आम्हाला दु:ख वाटत नाही,' असे झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनी ट्विट करत शुक्ला यांच्या टि्वटला उत्तर दिले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.