ETV Bharat / bharat

जगन मोहन रेड्डींनी घेतली शपथ, बनले आंध्र विभाजनानंतरचे दुसरे मुख्यमंत्री - swearing in ceremony

वायएसआर काँग्रेसला विधानसभेच्या १७५ जागांपैकी १५१ जागांवर यश मिळाले आहे. तर, त्यांनी लोकसभेच्या २५ जागांपैकी २२ जागांवर विजय मिळवला आहे. रेड्डींनी आज शपथ घेतली असून त्यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना ७ जूनला होणार आहे.

जगन मोहन रेड्डी
author img

By

Published : May 30, 2019, 12:15 PM IST

Updated : May 30, 2019, 3:15 PM IST

नवी दिल्ली - वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी आज (३० मे) आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विजयवाडा येथी इंदिरा गांधी म्युनिसिपल स्टेडियमवर त्यांचा शपथविधी सोहळा झाला. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगन मोहन रेड्डी हे आंध्रचे दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याप्रमाणेच रेड्डी यांनीही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे.

४६ वर्षीय रेड्डी यांनी आज दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. येथे बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने शपथविधी सोहळ्याच्या तयारीमध्ये अडथळा आणला होता. रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. वायएसआर काँग्रेसला विधानसभेच्या १७५ जागांपैकी १५१ जागांवर यश मिळाले आहे. तर, त्यांनी लोकसभेच्या २५ जागांपैकी २२ जागांवर विजय मिळवला आहे. रेड्डी आज शपथ घेतली असून त्यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना ७ जूनला होणार आहे.

शपथ घेतल्यानंतर रेड्डी आंध्र प्रदेशच्या निर्मितीशी संबंधित त्यांच्या 'व्हिजन आणि मिशन'विषयी माहिती देतील. ते राज्यातील लोकांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हेही सहभागी झाले.

Intro:Body:

जगन मोहन रेड्डी आज घेणार आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

नवी दिल्ली - वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी आज (३० मे) आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. विजयवाडा येथे शपथविधी सोहळा होणार आहे. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगन रेड्डी हे दुसरे मुख्यमंत्री बनणार आहेत. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याप्रमाणेच रेड्डी यांनीही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे.

रेड्डी आज दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. दरम्यान, येथे काल झालेल्या जोरदार पावसाने शपथविधी सोहळ्याच्या तयारीमध्ये अडथळा आणला आहे. रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. वायएसआर काँग्रेसला विधानसभेच्या १७५ जागांपैकी १५१ जागांवर यश मिळाले आहे. तर, त्यांनी लोकसभेच्या २५ जागांपैकी २२ जागांवर विजय मिळवला आहे. रेड्डी आज शपथ घेणार असून त्यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना ७ जूनला होणार आहे.

शपथ घेतल्यानंतर रेड्डी आंध्र प्रदेशच्या निर्मितीशी संबंधित त्यांच्या 'व्हिजन आणि मिशन'विषयी माहिती देतील. ते राज्यातील लोकांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यात आहे. या शपथविधी सोहळ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हेही सहभागी होतील.

Conclusion:
Last Updated : May 30, 2019, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.