नवी दिल्ली - योग हे एकतेचे प्रतिक असून वर्ण, लिंग, श्रद्धा, वंश आणि राष्ट्र अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव योगा करत नाही. योगा एक माणूसकी टिकवण्याचे खूप मोठे माध्यम आहे. कोरोना महामारीने जगभर थैमान घातले असताना, आजच्या घडीला योगाची पूर्वीपेक्षाही जास्त गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. आज सहावा जागतिक योग दिवस संपूर्ण जगभरात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी देशाला संबोधन केले.
मोदी म्हणाले, जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण कुठल्याही रोगाशी लढू शकतो. मात्र, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगा करणे गरजेच आहे. योगामधील वेगवेगळ्या आसनांमधून हे करण शक्य आहे. कोविड 19 विषाणू मानवी शरीराच्या श्वसनसंस्थेवर परिणाम करते. त्यामुळे प्राणायाम किंवा श्वासाचे व्यायाम करणे गरजेचे आहे. प्रामाणिपणे काम करणे हा सुद्धा एक प्रकारचा योग असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच त्यांनी लडाखमध्ये चीनी सैन्यांनी केलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर एकता आणि सार्वभौम बंधुत्त्वाचा उल्लेख करत योग दिवसानिमित्त भारतातियांना संबोधित केले.
मोदी म्हणाले, कितीही वाईट परिस्थिती असली तरीही क्रियाशील राहणे. हार न मानने हे योगामुळे आपल्या आयुष्यात ऊर्जा मिळते. योग करणारी व्यक्ती कधीही घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे हेच तर योगा आहे. योगा सर्व भेदभावांच्या वर आहे. तो कुणीही करू शकतो. योगाच्या माध्यमातून समस्याच्या निराकरणाची गोष्ट करत आहोत. योगामुळे जीवनात अधिक योग्य बननण्याची क्षमता प्राप्त होते. स्वतःच्या, आपल्या स्वकीयांच्या आरोग्यासाठी सजगपणे एकजुटीने पुढे जाऊ. आपण प्रयत्न करू की, घरात योगा व कुटुंबीयांसोबत योगा हे दररोज करू. हे केले तर आपण जरूर यशस्वी होऊ. असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.