भोपाळ - मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून जारदार पाऊस पडत आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील सुकड नदीवरील पाण्याखाली गेलेला पूल ओलांडत असताना एक तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये वाहून गेला आहे. ही घटना नरसिंगढ येथील छोटा बैरसिया येथे घडली.
नदीच्या काठावरील नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला आहे. सुकड नदी दुथडी भरून वाहत असतानाही एका युवकाने नदीवरील पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. प्रवाहात वाहून गेलेला युवकाचा प्रशासन शोध घेत आहे. पूल पाण्याखाली गेला असतानाही प्रशासनाने गावकऱयांची कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काल (गुरुवार) सकाळपासूनच पूलाचे पाणी नदीच्या पुलावरुन वाहत होते. त्यामुळे अनेकजण अडकून पडते होते.