ETV Bharat / bharat

काश्मीरच्या आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू, परिसरात तणाव

आर्टिकल ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या आंदोलनात असरर सहभागी होता. यावेळी जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या अंगावर गोळी लागल्याची कोणतीही जखम नव्हती.

author img

By

Published : Sep 4, 2019, 8:42 PM IST

Youth dies of injuries in Srinagar hospital

श्रीनगर - काश्मीरमधील आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा आज दवाखान्यात मृत्यू झाला. असरर अहमद खान असे या तरुणाचे नाव होते. यानंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते. त्यामुळे, श्रीनगरच्या काही भागात प्रशासनाकडून नागरिकांवर पुन्हा काही वेळासाठी निर्बंध घातले गेले.

सौरा प्रांतातील शेर-ए-काश्मीर इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या अंगावर गोळी लागल्याची कोणतीही जखम नव्हती.

मागील महिन्यात कलम ३७० हटवल्यानंतर, काश्मीरच्या सौरा प्रांतात जमावाने आंदोलन सुरु केले होते. असरर हा याच जमावामध्ये सहभागी होता.

हेही वाचा : पंजाबमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, १९ ठार तर २० जखमी

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.