हिसार (हरियाणा) - तीन ते चार वर्षांपासून पगार न दिल्यामुळे येथील उकलाना मंडीतील त्रिवेणी विहारमध्ये राहणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केली. पवन कुमार असे या युवकाचे नाव आहे. त्याने फेसबुक लाईव्ह करत सकाळी चार वाजताच्या सुमारास आत्महत्या केली.
मृत पवनचे नातेवाईक चंद्रमोहन यांनी पोलिसांना सांगितले की, पवन खेदड़ थर्मल प्लांटमध्ये ट्रक- टेलरवर तीन-चार वर्षांपासून ड्राईवरची नोकरी करत होता. पवनच्या वडिलांचे 13 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मृत पवनला दोन बहिणी आहेत. त्या विवाहित आहेत. पवनला 8 वर्ष आणि 6 वर्षांच्या दोन मुली तसेच 4 वर्षांचा एक मुलगा आहे. पवन जेव्हाही घरी यायचा तेव्हा ते आपली आई आणि पत्नी तसेच आम्हा सर्वांना सांगायचा की, त्याचा तीन वर्षाचा पगार मिळत नाही. तसेच मालक मला शारीरिक आणि मानसिक रूपाने त्रास देत आहेत. तसेच गाडी चालवणे बंद केले तर मागील सर्व वेतन दिले जाणार नाही, अशी धमकीही देत होते. जबरदस्तीने ते त्याला गाडी चालवायला सांगत होते. मागील सहा ते सात दिवसांपासून तो घरीच होता. तसेच चिंताग्रस्त अवस्थेत होता.
10 ऑक्टोबरला पवन ने रात्री 11 वाजता फेसबुक लाईव्ह करत फाशी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आम्ही सर्वांनी त्याला समजावले. यानंतर तो झोपला. तसेच परिवारातील सर्व सदस्य पण झोपले होते. मात्र, सकाळी मी माझे फेसबुक पाहिल्यावर मला माहित झाले की, पवन ने पंख्याला लटकून फाशी घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. पवन ने सकाळी चार वाजता फेसबुक लाइव्ह करत हांसी निवासी परूषोत्तम, बालक निवासी अनिल, बालक सरपंच कुलदीप, बधावड़ निवासी सुनील यांच्या द्वारा पगार न दिल्यामुळे तणावात येऊन आत्महत्या केली.
तपास अधिकारी सतपाल सिंह यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह परिवाराच्या ताब्यात दिला. चारही जणांविरोधात तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे.