ETV Bharat / bharat

गायींच्या मृत्यूप्रकरणी ८ अधिकारी निलंबित, योगी सरकारचा निर्णय - yogi adityanath

पोलिसांनी या जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 'प्रथमदर्शनी ३५ जनावरांचा वीज पडल्यामुळे झाल्याची शक्यता समोर येत आहे. इतर जनावरांवर उपचार सुरू आहेत,' असे जिल्हा मॅजिस्ट्रेट भानूचंद्र गोस्वामी यांनी म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Jul 15, 2019, 1:46 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या गायींच्या मृत्यूप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारने ८ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच, या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. जिल्हा मॅजिस्ट्रेटसह या अधिकाऱ्यांनी गुरा-ढोरांची देखभाल करण्यात दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हा मॅजिस्ट्रेटशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तसेच, प्रयागराजच्या आयुक्तांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, गायींच्या मृत्यूंना जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे. प्रयागराज येथील तात्पुरत्या निवारा गृहातील ३५ गुरांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत हा निर्णय घेण्यात आला. गायींबाबत निष्काळजीपणा केला आणि त्यांचा मृत्यू झाला तर निष्काळजीपणा केल्याबद्दल गोहत्या अधिनियम आणि पशू क्रूरता निवारण कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 'प्रथमदर्शनी ३५ जनावरांचा वीज पडल्यामुळे झाल्याची शक्यता समोर येत आहे. इतर जनावरांवर उपचार सुरू आहेत,' असे जिल्हा मॅजिस्ट्रेट भानूचंद्र गोस्वामी यांनी म्हटले आहे.

Intro:मुंबई

कर्नाटकचा राजकीय तिढा सुटावा बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी काँग्रेस अजूनही प्रयत्नशील आहे. परंतु हे बंडखोर आमदार मात्र काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांना भेटण्यास तयार नाही आहे. असे पत्रच या आमदारांनी मुंबई पोलिसांना दिले आहे. या अगोदर ही काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवास धोका आहे असे पत्र या आमदारांनी लिहले होते. Body:काँग्रेस नेत्यांकडून आम्हाला धमक्या येत आहेत असे पत्र त्या आमदारांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे. मल्लिकार्जुन खर्गे किंवा गुलाम नबी आझाद या काँग्रेस नेत्यांशी आम्हाला चर्चा करायची नाही. तरीही त्यांच्याशी चर्चा करावी असा दबाव आमच्यावर टाकला जात आहे. आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे. या पत्रावर 10 बंडखोर आमदाराच्या सह्या आहेत. हे बंडखोर आमदार पवई येथील रेनिसन्स हॉटेलमध्ये वासव्यास आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.